एक्स्प्लोर

Pankaja Munde : मनोज जरांगेंवर टीका केली नाही, केली तर शब्द मागे घेत नाही, मी गोपनाथ मुंडेंची औलाद : पंकजा मुंडे

Beed Lok Sabha Election : वंचित आणि पीडितांची वाली होण्याची शपथ मी गोपीनाथ मुंडे यांच्या चितेवर घेतली असल्याचं भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सागितलं. 

बीड : राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत असलेल्या बीडमध्ये आता मनोज जरांगे (Manoj Jarange) विरुद्ध पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वादाची चर्चा सुरू आहे. मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही, आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. गरींबांसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर आपण टीका केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) वक्तव्य केल्यानंतर बीडमध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. त्यानंतर आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिल आहे. गेवराई तालुक्यातल्या उमापूर येथे प्रचार सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

मी जरांगेंवर टीका केली नाही

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की, वर्षभरात मी मनोज जरांगे पाटलाचं नाव देखील घेतलं नाही. मला ज्याच्यावर बोलायचं आहे मी त्याच्यावर मोठ्या आवाजात बोलते आणि मी जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे. गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलावर मी टीका केली नाही. 

मला वंचितांसाठी आणि पीडितांसाठी काम करायचं आहे, वंचित आणि पीडितांची वाली होईन अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांच्या चितेवर घेतली होती आणि वंचितांच्या बाजूने उभे राहण्यासाठी मी कोणालाही घाबरत नसल्याचं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. 

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसतं. त्यासाठी विधानसभा, संसदेत कायदा करावा लागतो. त्यासाठी निवडून आलेल्या लोकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता येतो. उपोषण केल्याने त्याचा काही फायदा होत नाही. 

माझ्या वाट्याला जाऊ नका

पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मला माहिती नाही. पण मी त्यांच्या वाट्याला गेलो नाही, त्यांनीही माझ्या वाट्याला जाऊ नये. 

 बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे हे उभे आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget