Nashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी देखील जोर लावला आहे. त्यातच आज शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) एबीपी माझाशी बोलताना भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
समाज आमच्यावर प्रेम करतो. भाजपसह समाजातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, यंदा लढायचे आणि जिंकायचे. विजय निश्चितच आमच्या बादली चिन्हाचा होणार आहे, असा दावा शांतीगिरी महाराजांनी केला आहे.























