माझ्या वाट्याला जाऊ नका, जरांगे पाटलांचा पंकजा मुंडेंना इशारा
मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, माझ्या वाट्याला जाऊ नका असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांना इशारा दिला आहे.
Manoj jarange Patil on Pankaja munde : मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, माझ्या वाट्याला जाऊ नका असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांना इशारा दिला आहे. उपोषण करुनच आरक्षण मिळाले, उर्वरित समाजालाही आरक्षण मिळेल असंही जरांगे म्हणाले. उपोषण करुन आरक्षण (reservation) मिळत नसते असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे
पंकजा मुंडे ((Pankaja munde) काय म्हणाल्या हे मी ऐकलं नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, समाजाला नाही. मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, तुम्ही माझ्या वाट्याला जाऊ नका असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी उपोषण करुन आरक्षण मिळत नसते असे वक्तव्य केल्याच्या विषयावर जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी वक्तव्य केले आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी गेवराई येथे झालेल्या मेळाव्यात मी इतके दिवस जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाबाबत बोलले नाही. मला जे काही बोलायचे ते डायरेक्ट बोलते असे पंकजा मुंडे यांनी गेवराई येथील मेळाव्यात म्हटले होते. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या विरोधात मी कधीही बोलले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर चांगलीच टोलेबाजी करताना दिसत आहेत. अशातच पंकजा मुंडे यांनी उपोषणाच्या संदर्भात ओक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या वाट्याला जाऊ नका असा इशाराच जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंना दिलाय. तर मी मनोज जरांगे यांच्याबाबत कोणतही वक्तव्य केलं नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलचं गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी लगेच प्रतिक्रिया देत मी जरांगे पाटील यांच्याबाबत कोणतही वक्तव्य केलं नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मुकेश अंबानी मला विचारतात, कैसे हो पंकजा?; मुंडेंचं भाषण, परळीकरांना आश्वासन