Special Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो
Special Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो
आरएसएस भाजपची मातृसंस्था मानली जाते. संघाच्या विचारातूनच जनता पार्टी आणि पुढं भाजपचा जन्म झाला हा इतिहासही आहे. पण भाजपचे सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना आता भाजप सक्षम आहे आणि आधीसारखं संघावर अवलंबून नाही असं वाटतं. नड्डा यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात नुसत्या भुवया उंचावल्या नाहीत तर नड्डा असं कसं बोलले अशी चर्चाही सुरु आहे.. भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव... एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात...
All Shows

































