(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke on Majha Katta : पैसे कोण पुरवतं? सरपंच, जिल्हा नियोजन, आमदारकी ते विखे पाटलांशी टक्कर, निलेश लंकेनी माझा कट्टावर प्रवास उलगडला
Nilesh Lanke on Majha Katta :"मला मित्रमंडळी जोपासण्याची एक सवय आहे. मैत्री जपण्याचा छंद आहे. मी जिल्ह्यात फिरत असताना अनेक लोकांना वाटलं की, निलेश लंके आता लोकसभेचा उमेदवार होतो की काय?"
Nilesh Lanke on Majha Katta :"मला मित्रमंडळी जोपासण्याची एक सवय आहे. मैत्री जपण्याचा छंद आहे. मी जिल्ह्यात फिरत असताना अनेक लोकांना वाटलं की, निलेश लंके आता लोकसभेचा उमेदवार होतो की काय? प्रत्येक तालुक्यात माझा जनसंपर्क वाढला. एखाद्याच्या सुखा-दु:खात सहभागी होऊ लागलो. अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. हे लोकांच्या लक्षात आलं. याचा नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघ सोडून श्रीगोंदा मतदारसंघात यायचा काय संबंध? राहुरीत येण्याचा काय संबंध ? पाथर्डीत येण्याचा काय संबंध? कर्जत-जामखेडमध्ये येण्याचा काय संबंध? त्यावेळेस त्यांना वाटू लागले की हा लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो", असं अहमदनगरचे खासदार निलेश लंके म्हणाले होते. ते माझा कट्टावर बोलत होते.
2008 ते 2009 च्या दरम्यान मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की, मी एका गावचा सरपंच होईल
निलेश लंके म्हणाले, राजकारणात कोणतीही गोष्ट ठरवून होत नाही. माझा राजकीय प्रवास अपघाताने होऊन गेला. 2008 ते 2009 च्या दरम्यान मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की, मी एका गावचा सरपंच होईल. कामाच्या माध्यमातून मी सरपंच पदाला मी न्याय दिला. लोकांनी नंतर पंचायत समितीत पाठवलं. त्यानंतर अडिच वर्षांनी उपसभापती पदाची संधी मिळाली. नंतर जिल्हा परिषदची संधी मिळाली. जिल्हा परिषदेत काम करत असताना 2019 मध्ये विधानसभेत जाण्याचा योग आला. या सर्व घटना माझ्यासाठी धक्कादायक होत्या. मला खरच आमदार झालोय, असं वाटत नव्हतं. जनतेने जे प्रेम दिलं, त्याची परतफेड आपण कामाच्या माध्यमातून करायची ठरवलं. लोकांच्या सुखा-दुख:त सहभागी झालो. अडचणीच्या काळात आपण गेलं पाहिजे. आपल्या राजकीय ताकदीचा फायदा त्यांच्यासाठी झाला पाहिजे. असा विचार करुन मी आमदार झाल्यानंतर काम करु लागलो.
पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, आमदारकीनंतर एक टक्का देखील खासदारकीचा विचार नव्हता. निवडणुकीला सामोरे जाईपर्यंत माझ्या डोक्यात काय नव्हतं. मला राज्यात काम करण्याची आवड होती. चार-साडेचार वर्षात मी मतदारसंघात बरीच काम केली. मला लोकांशी असलेले संबंध जोपासता आले. माझ्या मनात दिल्लीबाबत कोणताही विचार नव्हता. मात्र, काही नेते-मंडळीकडून माझ्यावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागलो. त्यांनी माझ्यावर टीका-टिपण्णी करायला सुरुवात केली. त्यानंतर लोकांनीच मला त्यांचा विरोधक म्हणून डोक्यावर घेतलं. खरं पाहिलं तर माझे प्रचारक जनताच होती. हे सर्व पक्षीय नेतृत्वाच्या लक्षात आलं. आमचा मतदारसंघ कधीच राष्ट्रवादीला मिळाला नव्हता. संबंधित कुटुंब निलेश लंकेंवर बोलतं म्हणजे हा माणूस काऊंटर करु शकतो, हे पक्षीय नेतृ्त्वाला समजलं. त्यानंतर त्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
कुटुंब राजकारणात असेल तर पुढच्या पिढीला राजकारणात येणे सोपे जाते
बऱ्याच युवकांना वाटतं की राजकारणात आलं पाहिजे. जर 1 हजार कार्यकर्त्यांना असं वाटत असेल आणि माझा प्रवास मी सांगितला तर 900 जण म्हणतील मला काही पडलं नाही राजकारणाचे असं म्हणतील. कुटुंब राजकारणात असेल तर पुढच्या पिढीला राजकारणात येणे सोपे जाते. आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला ते फार अवघड असतं. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नसले तर राजकारण फार अवघड आहे. निवडणुकीत अनेकदा माझ्याकडे डिझेलला सुद्धा पैसे नसायचे. नेहमी संघर्ष केला, सर्व गोष्टींना मात दिली. माझ्याकडे इच्छाशक्ती आहे, प्रचंड कॉन्फिडन्स आहे. त्यावरच आजवरचा प्रवास झाला. माझ्या कुटुंबात राजकारणात कोण नव्हतं. वडिल शिक्षक होते, असंही निलेश लंके यांनी सांगितलं.
पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यावेळी मोबाईल नव्हता. निवडणुकीमुळे लोकांची देणं झाली. वडिली निवृत्त झाले. मी आमदारकीचा फॉर्म भरेपर्यंत मला घरचे लोक शिव्या देत होते. तुम्ही समाजसेवा केली, हे कुटुंबाला मान्य नसतं. त्यामुळे माझ्या घरातल्या लोकांना माझं काय चाललय हे मान्य नसायचं. त्यावेळी माझ्या मित्रांनी मदत केली. निवडणुकीच्या काळात ती कमीत कमी दोनचारशे गावात गेली होती. त्यांचेही आताही पाठबळ मिळू लागलय. एमआयडीसीला संरक्षण दिलं, त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही अडचणीत आलो. आमच्यावर हल्ले होऊ लागले होते, असंही निलेश लंके म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या