Nilesh Lanke on Majha Katta : माजी आमदाराच्या पायावरुन गाडी गेली, शिवसेनेतून हकालपट्टी कशी झाली? निलेश लंकेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा किस्सा
Nilesh Lanke on Majha Katta : "मी तालुकाप्रमुख होतो, गावात सांगितलं जायचं याचं नाव टाकू नका. याला निमंत्रित करु नका. मी गेलो की, माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे आमच्यात दरी निर्माण झाली"
Nilesh Lanke on Majha Katta : "मी तालुकाप्रमुख होतो, गावात सांगितलं जायचं याचं नाव टाकू नका. याला निमंत्रित करु नका. मी गेलो की, माझ्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे आमच्यात दरी निर्माण झाली. त्यानंतर जिल्हा नियोजनची निवडणूक लागली. मी शिवसेनेला म्हटलं. मला जिल्हा नियोजनची उमेदवारी द्या. पक्ष म्हटला तुमच्या आमदारांना आम्हाला सांगायला लावा. त्यावेळी आमचे जिल्हाप्रमुख गावडे सर होते. त्यांना आमदारांना डावलून निर्णय घेता येत नव्हता. त्यामुळं आम्हाला आमदारांना सांगायचं नव्हतं. आमदारमध्ये आणि माझ्यात अंतर पडलं. त्यामुळं सूचक म्हणून कोणी सही करत नव्हते. मी राष्ट्रवादीच्या एकाची सही घेतली. जिल्हा नियोजनची ताकदीने निवडणूक लढवली. शेवटी अशी वेळ आली की, शिवसेनेला उमेदवार नव्हता. माझी यंत्रणा रात्री बारानंतर सुरु होते. त्यावेळी सर्वांत जास्त जिल्हा नियोजनला निवडून आलो होतो. अधिकारी थांबायचे निलेश लंके कोण आहे हे पाहायला. त्यानंतर आवटींनी माझ्यासोबत पॅचअपचा प्रयत्न केला, असे निलेश लंके म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते.
माजी आमदारांच्या पायवरुन गाडी गेली, शिवसेनेतून हकालपट्टी झाली
निलेश लंके म्हणाले, मी 30 कार्यकर्त्यांना फोन केले. माझं तुमच्याकडे काम आहे म्हणालो. त्यानंतर बऱ्याच जणांना निर्णय आला आपण विधानसभा लढवू. काहीजण म्हणाले जुळणार नाही. शेवटी विधानसभा लढवायचे ठरले. त्यानंतर सोशल मीडियावर स्ट्रॅटेजी केली. 2018 च्या दरम्यान आमच्या इथे उद्धव ठाकरे आले होते. आवटींनी पक्षाला सांगितलं, त्याच्याबाबत निर्णय घ्या. 27 फेब्रुवारी 2018 ला आवटींचा वाढदिवस होता. त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलावलं. मी तालुकाप्रमुख होतो, मला डावललं. मग कार्यकर्त्यांनी मला उचलून घेतलं. उद्धव साहेब बोलत होते, तेव्हा आम्ही आतमध्ये शिरलो. पोरांनी गेट तोडून टाकले आत घुसलो. आवटींनी भाषण संपवलं. उद्धव ठाकरेंना वाटलं हा माझ्या सभेत गोंधळ घालायला आलाय. मी डायरेक्ट गेलो, उद्धव साहेबांच्या पाया पडलो. त्यावेळी उद्धव साहेब बाहेर पडले. आमच्यामागे माजी आमदार अनिलभैय्य राठोड होते. भैय्यांनी माझा हात धरला होता, त्यांच्या पायावरुन साहेबांच्या बॉडीगार्डची गाडी गेली. मग आम्ही गाडी फोडून टाकली. त्यानंतर काहीजणांनी सांगितलं की, याची हकालपट्टी करा. त्यानंतर माझी हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आम्ही ठरवलं. त्यांना समजावून सांगू. पण निवडणूक लढता येणार नाही, म्हणून आम्ही उद्धवसाहेबांकडे गेलो नाही. त्यानंतर आम्हाला अजित पवारांनी उमेदवारी दिली आमदार झालो.
समाजासाठी सगळं केलं. लोकांनी मला डोक्यावर घेतलं. माझ्या गाडीचे डिझेल कोण टाकतं? मला देखील माहिती नाही. माझी गाडी ज्याच्या नावावर तोच गाडीचे हप्ते भरतो. सर्व यंत्रणा अशीच आहे. माझा मोबाईल फुटला, तर माझा कार्यकर्ता मला मोबाईल आणून देतो. मी कार्यकर्ते स्टेबल केले. कार्यकर्ते स्टेबल केल्यामुळे प्रत्येक गावागावात फिरलो. मला कित्येक लोकांनी पैसे दिले, असंही निलेश लंके यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
शरद पवारांना कोणतं वचन दिलं होतं? अजितदादांची साथ कशी सोडली? निलेश लकेंनी सविस्तर सांगितलं