NCP Crisis : शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस, लवकरच उत्तर दाखल करणार
NCP Crisis : शरद पवार गटातील आठ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. तर आतापर्यंत दहा आमदारांना विधीमंडळाकडून नोटीस बजावण्यात आलीये.
मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये अशी याचिका अजित पवार (Ajit Pawar) गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर याबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार (Sharad Pawar) गटातील आमदारांना नोटीस बजावली. आतापर्यंत शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजाववण्यात आली आहे. तसेच अजित पवार गटातील तीस जणांना देखील नोटीस बजावण्यात आलीये. तर दोन्ही गटातील नेत्यांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आलाय. याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आलीये. शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. तसेच नवाब मलिकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी देखील कोणतीही नोटीस बजावली नाही.
'या' आमदारांना बजावली नोटीस
अनिल देशमुख,राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षात फुट पडली आणि पक्षावर दावा करण्यात येऊ लागला. त्यानंतर पक्ष, चिन्ह यांची लढाई सुरु झाली. त्यानंतर आपल्याला अपात्र का करु नये याबाबत अजित पवार गटाकडून याचिका विधीमंडळात करण्यात आली होती. त्यावर म्हणणं मांडण्यासाठी शरद पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावण्यात आलीये.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार गटाकडून आमदांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पण आपल्याला अपात्र का करु नये अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर उत्तर देण्यासाठी विधीमंडळाने सुरुवातील जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आता शरद पवार गटातील आणखी आठ आमदारांना ही नोटीस बजावण्यात आलीये. तसेच अजित पवार गटातील 30 जणांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.
हेही वाचा :