Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
Australia vs India, 2nd T20I: सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिले की तो भारतीय संघ पक्षपातीपणाला कंटाळला आहे, कारण हर्षित राणाला संधी दिली जात आहे तर अर्शदीपला बाहेर ठेवले जात आहे.

Australia vs India, 2nd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये पार पडला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धुव्वा उडवत चार विकेट्नी विजय मिळवला. त्यामुळे मेलबर्नवरील 17 विजयाची मालिका सुद्धा खंडित झाली. भारतीय संघाने आपले पहिले पाच बळी फक्त 49 धावांत गमावले आणि इथंच पराभव निश्चित झाला होता. अभिषेक शर्माने आपली स्फोटक फलंदाजी करत 68 धावा केल्याने टीम इंडियाला किमान शंभरी गाठली. सातव्या क्रमांकावर आलेल्या हर्षित राणाने 35 धावांची खेळी केली.
- No. 3 Expert Tilak Varma is batting at 5
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) October 31, 2025
- Arshdeep Singh isn't in Playing 11
- Yashasvi Jaiswal isn't even in squad
- Sanju Samson is unnecessarily pushed at 3
- Harshit Rana is batting before Shivam Dube
Gautam Gambhir favourism is destroying Indian Cricket. pic.twitter.com/XkAtxqgQ7t
गौतम गंभीर नवा ग्रेग चॅपेल
दुसरीकडे, गेल्या वर्षभरात, भारताचा फलंदाजीचा क्रम वरपासून खालपर्यंत चांगलाच प्रस्थापित झाला आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हर्षित राणाला सातव्या क्रमांकावर पाठवल्याने सडकून टीका सुरु झाली आहे. हर्षितमुळे शिवम दुबेला बेंचवर ठेवण्यात आले. सोशल मीडियावरील लोकांनी गौतम गंभीरला नवीन ग्रेग चॅपेल म्हणायला सुरुवात केली आहे.
Mr. Gambhir is the new Greg Chappel here to ruin Indian Cricket.
— Sahil Paudel. (@sahil_paudel) October 31, 2025
Now Harshit Rana is sent before Shivam Dube.
I hope he gets fired soon. https://t.co/dU0Xteu2Qm
गौतम गंभीरला ट्रोल केले
सोशल मीडियावर एका चाहत्याने लिहिले की तो भारतीय संघ पक्षपातीपणाला कंटाळला आहे, कारण हर्षित राणाला संधी दिली जात आहे तर अर्शदीपला बाहेर ठेवले जात आहे. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, "मला आश्चर्य वाटते की गंभीरचा हर्षितशी काय संबंध आहे." शिवम दुबेच्या आधी हर्षितला फलंदाजीसाठी पाठवण्याबद्दल लोकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
What was that batting plan, seriously?
— LoL’ey (@LoL_bobbey) October 31, 2025
Samson at 3 ahead of SKY, and sending Harshit Rana to bat when a proper batsman like Dube was available was even strange. Pure confusion out there. #INDvsAUS #StarNiAdugu@GautamGambhir 😠
गौतम गंभीरच्या फलंदाजी क्रमात बदल करण्याच्या निर्णयाला मूर्खपणाचेही म्हटले गेले. एका व्यक्तीने म्हटले की गौतम गंभीर हळूहळू ग्रेग चॅपेल बनत आहे, ज्याचे ध्येय भारतीय क्रिकेट नष्ट करणे आहे. तो म्हणाला की आता हर्षित राणाला शिवम दुबेच्या आधी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आहे, त्यामुळे त्याला आशा आहे की गंभीर लवकरच बाद होईल.
Indian team all out for 125 runs, thanks to Gautam Gambhir:
— Rajiv (@Rajiv1841) October 31, 2025
- Dropped WC winner Jaiswal from T2OIs who has 164 T2OI sr,
- Dropped Rinku Singh from T2OI XI permanently,
- Selected Gill because of his personal liking,
- Never let Shreyas getting select,
- Kicked Rutu out.
Shame!! pic.twitter.com/qzKSbkPCjV
इतर महत्वाच्या बातम्या
























