एक्स्प्लोर

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई

याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला (Sikandar shaikh) पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासातून समोर आला आहे. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस (Police) तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 च्या माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, सिकंदर शेख याची महाराष्ट्रात चर्चा झाली होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी त्याला खांद्यावर घेतलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप मोठे ट्रोलिंग झालं होतं. कुस्तीवरुन राज्यातील वातावरण तापलं होतं. त्यानंतर, पुढच्याच वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2024 ची मानाची गदा पटकावली होती. तत्पूर्वीच, मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं त्याने म्हटलं होतं. पंढरपूरमध्ये बोलताना सिकंदर शेख यानं आपणच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सांगत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पराभवावर उत्तर दिले. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर जवळच्या भीमा साखर कारखान्यावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा सिकंदर शेखने पंढरपूरमध्ये हे वक्तव्य केलं होतं. मात्र, आज अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

दरम्यान, सिकंदरच्या अटकेनंतर राज्याच्या कुस्ती क्षेत्रात देखील चर्चांना उधाण आलं आहे. सिकंदरच्या बाजुने आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी, लवकरच अधिक माहिती समोर येईल.  

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : 'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
'कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट...', बहुमताला डावलून सरकारने गोकुळ 'हिसकावल्या'नंतर सतेज पाटील भडकले
B. R. Gavai On Gokul President 2026: गोकुळवर 5 शासननियुक्त संचालक नेमण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय; पण माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या एका विधानाने सरकारची अडचण?
गोकुळवर 5 शासननियुक्त संचालक नेमण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय; पण माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या एका विधानाने सरकारची अडचण?
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Embed widget