एक्स्प्लोर
Farmer Protest : कर्जमाफीवरून बच्चू कडू-जरांगेत मतभेद? सरकारची केवळ चाल? Special Report
शेतकरी कर्जमाफीसाठी (Farmer Loan Waiver) बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या आंदोलनानंतर सरकारने 30 जून 2026 पर्यंत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे, ज्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. 'ही प्युअर फसवणूक आहे, 30 जूनपर्यंत शेतकरी मरेल', अशा शब्दात मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. एकीकडे बच्चू कडूंनी याला शेतकऱ्यांचा विजय म्हटले आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह विरोधकांनी ही केवळ सरकारची वेळ मारून नेण्याची रणनीती असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी समिती एप्रिल 2026 पर्यंत अहवाल देईल आणि त्यानंतर 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. मात्र, तातडीची मदत गरजेची असताना इतकी मोठी मुदत का, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















