एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी कदम, देशमुख, ठाकूर यांच्या नावांची चर्चा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'महिन्यात नवा प्रदेशाध्यक्ष...'

Prithviraj Chavan on State President Of Congress: कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असून, नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

मुंबई: भाजपच्या प्रदेशाध्यपदाच्या बदलानंतर आता कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असून, नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत, तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का असेल, अशी चर्चा काँग्रेस पक्षात रंगली आहे. विश्वजीत कदम, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची नावे या पदासाठी चांगलीच चर्चेत आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली होती. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आता चार वर्षे झाली आहेत.

त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश मिळावलं. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे पटोले यांना हटवण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षामध्ये पुन्हा उत्साह निर्माण करेल, अशा नेतृत्वाच्या शोधात काँग्रेस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यासह वरिष्ठ नेत्याच्या नावांच्या चर्चा असतानाच आता पुन्हा एकदा पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रदेशाध्यक्ष पदासाठी यशोमती ठाकूर यांचं देखील नाव विदर्भातून पुढे चर्चेत येत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात आधिक जागा जिंकल्या आहेत. लोकसभेत काँग्रेसला विदर्भामध्ये चांगलं यश मिळालं. विदर्भातून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं नाव विधिमंडळ गटनेतेपदासाठी चर्चेत आहे. पटोले किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी कोणालाही विधिमंडळ गटनेते बनवले तर प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जावू शकते, अशी चर्चा आहे. 

जबाबदारी घेण्यास युवा नेत्यांचा नकार

अमित देशमुख यांना प्रदेशाध्यपद देण्यासाठी पटोले आग्रही आहेत. सतेज पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. जुलैमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत संपत आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येईल. त्यासाठी देखील सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. विश्वजीत कदम यांचे नाव देखील चर्चेत आहे. पक्षातील तरुण नेते स्वतःहून हे पद घेण्यास इच्छुक नाहीत, असंही म्हटलं जातंय. त्यामुळे पक्षातील बडे नेते किंवा तरूण नेते यांच्यापैकी कोणी स्वतःहून हे पद घेण्यास उत्सुक नसल्याचं चित्र आहे, मात्र, पक्षाने दिले तर ही जबाबदारी घ्यावी लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

नावांच्या चर्चेबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या होणाऱ्या नावांच्या चर्चेबाबत बोलताना म्हटलं, होणाऱ्या चर्चांवर माझं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाही. या महिन्यात नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही हे मला माहीत नाही, असंही ते पुढे म्हणाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलंABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सManoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणीVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Embed widget