एक्स्प्लोर

Morning Headlines 20th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

PM Modi in Maharashtra : महाराष्ट्रात पंतप्रधान सभांचा धडाका! आज परभणी, नांदेडमध्ये मोदींची सभा

नांदेड : आज परभणी, नांदेडमध्ये मोदींची सभा होणार आहे. नांदेड येथे सकाळी 10 तर परभणीत 12 वाजता पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मोदींच्या नियोजित सभांच्या वेळेमध्ये बदल झाला असून आता परभणी ऐवजी नांदेड येथे त्यांची पहिली सभा होणार आहे त्यानंतर परभणीत सभा घेतली जाणार आहे. वाचा सविस्तर...

Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो, फडणवीसांचा शब्द; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते, असा दावा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार आणि नंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असं फडणवीस म्हणाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा करत म्हटलं आहे की, भाजपनं मला माझ्याचं लोकांसमोर खोटं पाडलं. वाचा सविस्तर...

Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात आजही काही भागात पावसाची शक्यता (Unseasonal Rain) असून काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळेल. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. यामुळे शेतीसह फळबागांचंही नुकसान झालं आहे. परभणीतील पुर्णा तालुक्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस त्यामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचं नुकसान झालं आहे. आज दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे, तर त्याउलट उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. वाचा सविस्तर...

जलसंकट गडद! मराठवाड्यात फक्त 16 टक्के तर पश्चिम महाराष्ट्रात 29 टक्के जलसाठा, राज्यातील पाण्याची स्थिती काय?

Water condition : राज्यात उन्हाचा (Heat) चटका चांगलाच वाढत आहे. काही भागात तापमानाचा (temperature) पारा 40 अंशाच्या पुढे जात आहे. तर काही भागात अवकाळी पाऊसही (Rain) पडत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस राज्यातील पाणीसाठ्यात (water) मोठ्या प्रमाणात घट होत आहे. राज्यातील धरणांमधील (Dam) पाणीसाठी हा 32 टक्क्यांपर्यंत खाली पोहोचला आहे. गतवर्षी याचवेळी राज्यातील पाणीसाठा हा 42 टक्क्यांवर होता. वाचा सविस्तर...

Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार

पुणे : बारामती लोकसभेसाठी (Baramati Lok Sabha Election 2024) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) लढत होणार आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एक वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर, निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांचं (Ajit Pawar) वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने (Election Commission) दिले आहेत. वाचा सविस्तर...

Deepika Padukone As Lady Singham: लेडी सिंघम! होणाऱ्या आईचा डॅशिंग लूक, 'सिंघम अगेन'मधील दीपिकाने शेअर केला फोटो

Deepika Padukone As Lady Singham:  बॉलीवूड अभिनेत्री हीने काहीच दिवसांपूर्वी तिची प्रेग्नंसी जाहीर केली. त्यानंतर तिने 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली. तिच्या बेबीबंपसह सेटवरचे दीपिकाचे (Deepika Padukone) फोटोही व्हायरल झाले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटात दीपिका पदुकोण 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत दिसणार आहे. मागीलवर्षात म्हणजेच 2023 मध्ये या सिनेमातील तिचा एक लूकही समोर आला होता. वाचा सविस्तर...

Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video

Ravindra Jadeja Catch CSK vs LSG: लखनौ सुपर जायंट्सने (LSG)  चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 8 गडी राखून पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनौच्या संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. लखनौचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी अर्धशतके झळकावली. डी कॉकने 43 चेंडूत 54 धावा केल्या. तर राहुलने 53 चेंडूत 82 धावा करत संघाच्या 8 गडी राखून विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. वाचा सविस्तर...

Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य

Horoscope Today 20 April 2024 : पंचांगानुसार, आज 20 एप्रिल 2024, आजचा दिवस शनिवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू  अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वासAllu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू  अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Sanjay Raut: मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप
मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Embed widget