Uddhav Thackeray : फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव ठाकरेंचा दावा
Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार आणि नंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असं फडणवीस म्हणाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते, असा दावा शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) मार्गदर्शन करणार आणि नंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असं फडणवीस म्हणाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा करत म्हटलं आहे की, भाजपनं मला माझ्याचं लोकांसमोर खोटं पाडलं.
'आदित्य ठाकरेंना सीएमपदासाठी तयार करतो, फडणवीस म्हणाले'
उद्धव ठाकरे यांनी एक अतिशय मोठा दावा केला आहे. आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन मला स्वतः अमित शाहांनी दिलं होतं याचा पुनरुच्चार देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पूर्वी लोक घाबरत होते, पण आता नाही
काँग्रेसही विरोधात उभा राहिला आहे. पूर्वी लोक त्यांना घाबरत होते. आता विरोधक समोर उभे ठाकले आहेत. 2023 पर्यंत लोक बोलायला घाबरत होते, पण आता नाही. आता लोकशाही धोक्यात आल्याचं सर्वांना वाटत आहे. राहुल गांधी किंवा मी समोर आलो, त्यामुळे लोकांना वाटते की कोणीतरी भाजपच्या विरोधात आहे . खोटी आश्वासने देणाऱ्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडसही त्यांनाही वाटत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाल आहेत.
भाजप धर्म आणि श्रीरामाच्या नावाने मतं मागतंय
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपनं कोणतंही काम केलेलं नाही आणि फक्त प्रश्रू श्रीरामाचं नाव घेऊन मतं मागितली आहेत. मी काल एक यूट्यूब व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये एका शेतकऱ्याला विचारले गेले की, त्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये मिळाले आहेत का? तर शेतकरी म्हणाला की,मला सरकारकडून 6000 रुपये मिळाले आहेत, पण मी एका वर्षात खतासाठी 1 लाख रुपये आणि 18 टक्के, 18,000 रुपये जीएसटी देतो. त्यामुळे सरकारचे माझ्याकडे 12,000 रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजपचा पराभव होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.