एक्स्प्लोर

Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार

Baramati Lok Sabha Election 2024 : सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एक वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे.

पुणे : बारामती लोकसभेसाठी (Baramati Lok Sabha Election 2024) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) लढत होणार आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एक वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर, निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांचं (Ajit Pawar) वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने (Election Commission) दिले आहेत. 

कचाकचा बटण दाबा, मतदान करा, अजित पवारांचं वक्तव्य

अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर यासंदर्भात अजित पवारांना विचारलं असता, चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत भाजप मेळाव्यात अजित पवारांनी भाषणात म्हटलं की, येणाऱ्या निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळणार हा माझा शब्द आहे. आचार संहिता नियम असतात पाळायचे असतात. 

निवडणूक आयोगाचा चौकशी करण्याचा अधिकार

मी इंदापूरमध्ये बोललो. ते ग्रामीण भाषेत बोललो, तेच पुण्यात असतो, तर तिथं कचा-कचा नाही चालत ज्या भाषेत चालतं तसेच बोलावं लागतं, चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार असं अजित पवार म्हणाले आहेत. जे ठरेल तसा महायुती धर्म आपण पाळू. इंदापूरमध्ये संयुक्त सभा असतील, त्याला मी उपस्थित राहील, मागचं खूप साचलं आहे. इतर पक्ष वेगळे पण भाजप हा शिस्तीचा पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात आलबेल असायचं, असं म्हणत अजित पवारांनी भाजप आणि बाकी पक्षांचा फरक सांगितला आहे.

विरोधक काहीही थापा मारतात

ज्यांच्याकडून निधी घ्यायचा त्यावर टीका करता कसे ते पैसे देतील. भूमिपूजन त्यांनीच केलं उद्घाटन देखील त्यांनीच केलं, असा नेता असावा लागतो, नाहीतर राजकारणी असतात निवडणूक आली की नारळ फोडत परत पुढची निवडणूक आली की नारळ फोडतात. मोदीनी महिलांना आरक्षण दिलं. मोदी परत निवडून आले तर संविधान बदलतील असं सांगितलं जातं आणि काहीही थापा मारतात, असं अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

सध्या अजित पवार गटात आहे, पण बारामतीत अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार, उत्तम जानकरांचा हल्लाबोल

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget