जलसंकट गडद! मराठवाड्यात फक्त 16 टक्के तर पश्चिम महाराष्ट्रात 29 टक्के जलसाठा, राज्यातील पाण्याची स्थिती काय?
दिवसेंदिवस राज्यातील पाणीसाठ्यात (water) मोठ्या प्रमाणात घट होत आहे. राज्यातील धरणांमधील (Dam) पाणीसाठी हा 32 टक्क्यांपर्यंत खाली पोहोचला आहे.
Water condition : राज्यात उन्हाचा (Heat) चटका चांगलाच वाढत आहे. काही भागात तापमानाचा (temperature) पारा 40 अंशाच्या पुढे जात आहे. तर काही भागात अवकाळी पाऊसही (Rain) पडत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस राज्यातील पाणीसाठ्यात (water) मोठ्या प्रमाणात घट होत आहे. राज्यातील धरणांमधील (Dam) पाणीसाठी हा 32 टक्क्यांपर्यंत खाली पोहोचला आहे. गतवर्षी याचवेळी राज्यातील पाणीसाठा हा 42 टक्क्यांवर होता.
कोकण आणि विदर्भात परिस्थिती चांगली
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात फक्त 16 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर मागील वर्षीच याचवेळी जवळपास 42 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात 34 टक्के तर पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये 29 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. तर कोकण आणि विदर्भात तुलनेनं परिस्थिती चांगली आहे. कोकणात एप्रिल महिन्यात देखील 46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पूर्व विदर्भात 43 टक्के तर पश्चिम विदर्भात 46 टक्के जलसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक असलेल्या जायकवाडी धरणात 13 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी निम्म्याहून अधिक पाणीसाठा शिल्लक होता.
मराठवाड्यात चिंताजनक स्थिती
राज्यात सध्या पाणी टंचाईच्या झळा लागत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या उन्हाबरोबर पाणी आणि चाराटंचाई वाढली आहे. अनेक धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम होत आहे. राज्यातील प्रमुख 138 मोठ्या धरणांमध्ये सध्या 32 टक्केच पाणीासाठा राहिला आहे. यामध्ये मराठवाड्याची स्थिती चिंताजनक आहे. कारण मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 16 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळं तिथं पाणीटंचाईचं संकट गडद होताना दिसत आहे.
पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वणवण
दरम्यान, पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वणवण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. सध्या एप्रिल महिना सुरु आहे. पुढचा मे महिना पूर्ण उन्हाळा असणार आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. कारण जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. पाऊस लवकर पडला तर बरे नाहीतर लोकांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या अनेक ठिकाणी पाण्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळं राज्यातील पुशपालक देखील चिंतेत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी पाण्याची आवश्यता आहे. मात्र, सध्या पाण्याची मोठी चंटाईनिर्माण झालीय.
महत्वाच्या बातम्या:
Water crisis: राज्यातील पाणीसंकट अधिक गडद, मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठ्यात मोठी घट