एक्स्प्लोर

Modi Government : "ऑगस्ट महिन्यात मोदी सरकार कोसळणार", नितीश कुमारांच्या जुन्या मित्राचा दावा

Lalu Yadav on Modi Government, Bihar : "केंद्रातील एनडीए सरकार कुबड्या घेऊन बनलं आहे. त्यामुळे हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. शिवाय काही महिन्यांनंतर बिहारमध्ये पुन्हा निवडणूका लागतील. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडीचे सरकार येईल"

Lalu Yadav on Modi Government, Bihar : राष्ट्रीय जनता दलाच्या वर्धापनदिना दिवशी माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी मोठा दावा केला आहे. "केंद्रातील एनडीए सरकार कुबड्या घेऊन बनलं आहे. त्यामुळे हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. शिवाय काही महिन्यांनंतर बिहारमध्ये पुन्हा निवडणूका लागतील. त्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडीचे सरकार येईल" असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. 

केंद्र सरकार अत्यंत कमकुवत आहे

मी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन करू इच्छितो, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. निवडणुका कधीही होऊ शकतात. केंद्र सरकार अत्यंत कमकुवत आहे. त्यांचा पाया खूपच कमकुवत आहे. या सरकारची स्वतःची काही तत्त्वे नाहीत. तत्त्वे बाजूला ठेवून हे सरकार सत्तेवर आले आहे. ऑगस्टपर्यंत हे सरकार पडण्याची दाट शक्यता आहे, असंही लालू यादव यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी तेजस्वी यादव यांनीही केंद्र सरकारबाबत हल्लाबोल केला. 

भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे 

तेजस्वी यादव म्हणाले, बिहारमध्ये आतापर्यंत कोसळलेल्या सर्व पुलांच्या उद्घाटनाची, पायाभरणीची आणि निविदा काढण्याची तारीख जाहीर केल्यास सर्व काही समोर येईल. मोदी सरकार पाच वर्षे टिकू शकणार नाही. 2024 किंवा 2025 मध्येच मध्यावधी निवडणुकांची परिस्थिती निर्माण होईल. आरजेडीचा 10-12 जागांवर जाणीवपूर्वक पराभव करण्यात आल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला. एवढेच नव्हे तर भाजपला गरिबांचा विकास नको आहे. हा आरक्षण विरोधी पक्ष आहे. आरक्षण संपवून या पक्षाला समाजातील दलित लोकांच्या हितावर आघात करायचा आहे. आम्ही आरक्षणाची मर्यादा 75 टक्के केली, पण भाजपला आरक्षण संपवायचे आहे.

 बिहारमध्ये सध्या पूल कोसळण्यावरून राजकारण सुरू आहे

राष्ट्रीय जनता दलाच्या वर्धापनदिना 28 व्या स्थापना दिनानिमित्त पाटणा येथील आरजेडी कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लालूप्रसाद यादव यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या चेहरा असलेले प्लॅस्टिकचे मुकुट घालून सर्वांचे स्वागत केले.  बिहारमध्ये सध्या पूल कोसळण्यावरून राजकारण सुरू आहे. तेजस्वी यादव यांच्यावर भाजप आणि जेडीयूकडून सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. नितीश यांचे निकटवर्तीय असलले मंत्री अशोक चौधरी आणि इतर मंत्र्यांनी केवळ तेजस्वी यादव यांच्या कार्यकाळात बांधलेले पूल कोसळल्याचे म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

विधानसभेसाठी रणनीती आणि विधान परिषदेसाठी मतांची जुळवा जुळव,'मविआ'च्या बैठकीत काय काय ठरलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget