Manoj Jarange : मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे कुटुंबीय निवडून आलं असतं का? तुम्ही आहात तरी किती? मनोज जरांगेंचा सवाल
Beed Lok Sabha Election : आम्हाला विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील? तुमची संख्या किती आहे? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
बीड : मराठे जातीयवादी असते तर दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) खासदार झाले नसते, त्यांच्या दोन्ही मुली खासदार, आमदार झाल्या नसत्या, पुतण्यासुद्धा आमदार झाला नसता असं वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलानासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलं. आम्हाला तुम्ही विरोधक समजत असाल तर मराठे कसे निवडून देतील तुम्हाला? तुम्ही आहात तरी किती? असा सवालही त्यांनी केला. माजलगाव येथे आयोजीत कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील बोलत होते. बीड लोकसभेसाठी 13 मार्च रोजी मतदान होणार आहे.
बीड लोकसभेमध्ये जातीचा मुद्दा पुढे आला असून त्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून बीडमध्ये आधी असा वाद झाला नसल्याचं सागितलं जातंय. त्यावर मनोज जरांगे यांनी आता वक्तव्य केलंय.
तुम्ही आहातच किती?
मनोज जरांगे म्हणाले की, मराठे जातीयवादी असल्याचा आरोप केला जात आहे. पण आम्ही जातीयवादी असतो तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे मंत्री, खासदार झालेच नसते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुडे हे आमदार झाले नसते, प्रीतम मुंडे खासदार झाल्याच नसत्या. तुम्ही जर मराठ्यांना विरोधक समजत असाल तर मराठे तुम्हाला कसे निवडून देतील? तुम्ही आहात तरी किती? आम्ही एकटे मराठेच साडेसहा लाख आहोत, त्यात मुस्लीम तीन लाख मिसळले तर खाली काय राहते?
मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याने केशरकाकू क्षीरसागर, बबनराव ढाकणे यांना देखील निवडून दिल्याचे सांगत मराठे जातीवादी नसल्याचे म्हटले आहे.
पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रोज काही ना काही ट्विस्ट येत असल्याचं दिसून येतंय. या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. पंकजा मुंडे यांनी त्यावर स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी त्यावरून विरोधकांनी मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खरं तर ती क्लीप अदखलपात्र आहे. तुम्ही हजार वेळा ही क्लिप ऐकल्यावरही तुम्हाला यात काहीही नाही हे कळेल. विशेष म्हणजे मोदींची सभा झाल्यावरच ही क्लिप व्हायरल का झाली? असा सवाल पंकजा मुंडेंनी केला आहे
ऑडिओ क्लीपमध्ये काय आहे?
बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना फॉर्म काढून घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. एवढेच नाही तर बंजारा समाजाची मतंही मलाच मिळणार आहेत. मात्र, त्यातले दहा पाच हजार मतं घेऊन फार काही होणार नाही, असेही यावेळी पंकजा मुंडे ऑडिओ क्लीपमध्ये म्हणताना ऐकायला येत आहे.
ही बातमी वाचा :