एक्स्प्लोर

Pankaja Munde : म्हणून मराठा भावाच्या मदतीसाठी आले; पंकजा मुंडेंची नगरकरांना भावनिक साद

Ahmednagar Lok Sabha Election : येत्या 13 मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

अहमदनगर : गोपीनाथ मुंडे यांचे आपल्यावर संस्कार असून आपण जातीवाद कधीही मानत असं भावनिक आवाहन करत मराठा भावाच्या मदतीसाठी आपण नगरमध्ये प्रचारासाठी आले असल्याचं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी सुजय विखेंना (Sujay Vikhe Patil) मतदान करावं असं मतदारांना आवाहन केलं. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हवामान खराब असताना हेलिकॉप्टरने प्रवास करत अहमदनगरच्या पाथर्डी येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. तब्बल साडेतीन तास उशिराने आलेल्या पंकजा मुंडे यांनी सुजय विखे यांना मतदान करण्याची विनंती केली. विशेष म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात जातीवाद सुरू असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. आपण मराठा भावाच्या मदतीसाठी आलो असून गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आपल्यात आहेत, जे कधीही जातीवाद मानत नाहीत अशी भावनिक साद त्यांनी आपल्या भाषणात मतदारांना घातली. 

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांच्या सभा सुरू असून शेवटच्या काही तासात मतदारांना साद घालण्यासाठी उमेदवार धावपळ करताना पाहायला मिळतात.

बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद? 

बीड लोकसभेसाठी मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असून भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत होणार आहे. मराठवाड्याच्या या पट्ट्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असल्याने पंकजा मुंडेची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. बीडमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद  (OBC Vs Maratha) सुरू असल्याचं चित्र आहे. 

बीड जिल्ह्यातील जातीय मतांचा आकडा - एकूण मतदान 21 लाखाहून अधिक

मराठा - सात ते साडेसात लाख 

वंजारी - साडेचार ते पाच लाख 

दलित - दोन ते सव्वा दोन लाख 

मुस्लिम - सव्वा दोन ते अडीच लाख

ओबीसी - म्हणजेच माळी आणि धनगर दोन ते अडीच लाख

लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होणार

आता बीड जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा पुढे येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बीडमध्ये झालेलं मराठा आरक्षणाचे तीव्र आंदोलन आणि त्यातच लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका.या निवडणुकात मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने दोन्ही समाजामध्ये आता जातीय ते निर्माण होताना पाहायला मिळतय. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा. मात्र या वेळेस या मुद्द्याला जास्त हवा मिळत असून याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होतील असं काही ज्येष्ठ पत्रकारांना वाटत आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget