एक्स्प्लोर

Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला

Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, सिन्नर पंचायत समिती सभापती, आमदार असा माणिकराव कोकाटे यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. आता त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Manikrao Kokate Profile : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रि‍पदे आली. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळाली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान सिन्नर येथे आयोजीत प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना आमदार करा मी त्यांना मंत्री करतो, मंत्रीमंडळात कोकाटेंना महत्वाची जबाबदारी देण्यात येईल असे आश्वासन सिन्नरकरांना दिले होते. आता अजित पवार यांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला आहे. जाणून घेऊयात माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकि‍र्दीबाबत...

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात छोट्या खेड्यात सोमाठाणे येथे 26 सप्टेंबर 1957 रोजी जन्मलेल्या कोणताही राजकीय वारसा नसलेले ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना  NSUI  संघटनेत प्रवेश घेऊन केली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून राजकीय प्रवास सुरू केला. जिल्हा परिषद सभापती, सिन्नर पंचायत समिती  सभापती, ते आमदार असा प्रवास केला. त्यांच्या राजकीय प्रवास नेहमीच संघर्षाचा राहिला आहे. 

सिन्नर विधानसभेत पाचव्यांदा आमदार

माणिकराव कोकाटे यांनी 1999  मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली. 2004 मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती. नंतर नारायण राणे यांच्या सोबत 2009 मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले  2009 साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा निवडून आले. 2०१४ मध्ये त्यांनी भाजकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजित दादा यांच्या गटात गेले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 41 हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार झाले. 

मतदारसंघातील प्रभावी विकासकामे 

पुरचारीचे काम, पुन्हा सेझ सुरू करण्यासाठीचे प्रयत्न, नदी जोड प्रकल्प, सिन्नर  MIDC साठी वाढीव जमीन संपादन करून घेऊन उद्योग क्षेत्रात भरीव काम केले आहे. तसेच आदिवासी समाजातून आलेले स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणे, खेळासाठी स्टेडियम उभारणी चालू आहे. आमदार कोकाटे यांनी त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक विकास प्रकल्पांवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे, रस्ते पायाभूत सुविधा,शहरासाठी 100 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केली, ग्रामीण पाणीपुरवठा योजना यासारख्या अनेक समस्यांचे निराकरण केले आहे.700 कोटींचा पर्यटन प्रकल्प आणि कळसूबाई पीक रोपवे प्रकल्प यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. वारंवार पक्ष बदल होत असतानाही, कोकाटे यांची अनुकूलता आणि तळागाळातील समस्यांशी जोडलेले असल्यामुळे त्यांच्या स्थायी राजकीय उपस्थितीत योगदान दिले आहे.

आणखी वाचा 

Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget