एक्स्प्लोर

मोठी बातमी : मुंबईची जागा सोडली पण कल्याण-ठाण्यासाठी शिंदे आग्रही, अजित पवार गटाला एक अंकी जागा, तिकीट कापलेल्या खासदारांचंही ठरलं!

शिंदे गटाच्या ज्या खासदारांचे तिकीट कापण्यात येईल त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे.मुंबईतील एक जागा शिंदे गट भाजपला सोडण्यात तयार आहे.

नवी दिल्ली : राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा (Maharashtra Mahayuti Seat Sharing) अंतिम टप्प्यात आली असून अजित पवार गटाला (Ajit Pawar) एक अंकी जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या ज्या खासदारांना तिकीट मिळणार नाही त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीची जागावाटपाची चर्चा झाली असून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहॆ. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी यावर प्राथमिक चर्चा झाली होती.

शिवसेना मुंबईची जागा भाजपला सोडणार

मुंबईत भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढवण्यात येणार आहेत. त्यासाठी शिंदे गटाने मुंबईतील एक जागा भाजपला सोडण्याची तयारी ठेवल्याची माहिती आहे. त्याचवेळी ठाणे आणि कल्याणची जागा आपल्याकडेच राहावी यासाठी शिंदे गट आग्रही असल्याची माहिती आहे. 

सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्याकडून जागावाटपाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये कल्याण आणि ठाण्यासाठी ते आग्रही होते. ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला होता. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या वाट्याची मुंबईतील जागा त्यांनी भाजपला सोडण्याची तयारी दर्शवली. 

अजित पवारांना एक अंकी जागा

त्यानंतर अजित पवारांनी अमित शाह यांच्यासमोर जागावाटपाचा प्रस्ताव सादर केला. सुरुवातीला शिंदे गटाला जितक्या जागा दिल्या जातात तितक्याच आम्हाला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. पण आता अजित पवारांना एक अंकी जागा मिळणार हे नक्की झालं आहे.

तिकीट कापलेल्या खासदारांचे पुनर्वसन होणार

शिवसेना शिंदे गटाच्या ज्या खासदारांचे तिकीट कापलं जाणार आहे त्या खासदारांचे वेगळ्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरल्याची माहिती आहे. या खासदारांना विधानपरिषद किंवा विधानसभेवर संधी दिली जाणार आहे.

राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शाहंनी पुढाकार घेतला असून त्यातून मार्गही निघाल्याची माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार असून त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे आणि त्या खालोखाल जागा या अजित पवार गटासाठी सोडण्यात येणार आहेत.

कमी जागा मिळालेल्या शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला विधानसभेच्या वेळी जास्त जागा देण्याचं आश्वासन भाजपने दिल्याचं समजतंय. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची घोषणा
Maharashtra Live Blog Updates: काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची घोषणा
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Devendra Fadnavis on Nashik Crime: नाशिकमधील नामांकित कंपनीत जिहादी रॅकेटचा संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकमधील नामांकित कंपनीत जिहादी रॅकेटचा संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Shubman Gill: अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Washington Sundar: गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
Tamilnadu Custodial Deaths: बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
Embed widget