Maharashtra BJP Meeting: पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?; भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
Sudhir Mungantiwar On Pankaja Munde: गेल्या काही दिवासांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Maharashtra BJP Meeting मुंबई: भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल मुंबईतील सागर या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्राथमिक ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे. तसेच पुन्हा एक कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीवर मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभेचे विश्लेषण करून ज्या उणिवा व ज्या पद्धतीने खोटा प्रचार झाला, या संदर्भात चर्चा झाली. तसेच विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विश्लेषण चांगलं झालं. महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने चर्चा झाली. आपल्याला उत्तम योजना दिल्या पाहिजे यावर पंधरा दिवसापूर्वी चर्चा झाली.चांगल्या योजना देणे महायुतीच्या सरकारची जबाबदारी व कर्तव्य असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आरक्षणावर काय म्हणाले?
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर निश्चित विचार मंथन होणे गरजेचे आहे. जाती-जातीत तेढ निर्माण होणे दुरावा निर्माण होणे हे राज्यासाठी चिंतेची बाब आहे. जी समरसता महाराष्ट्रात आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून अठरापगड जातीची आपण भाषा करतो, मग आमच्यातला एक सूर एक विचार हा एकीचा भाव जात विरहित जास्त महत्त्वाचं असल्याने अशा पद्धतीची चिंता होणं व त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पंकजा मुंडेंवर काय प्रतिक्रिया दिली? (Sudhir Mungantiwar On Pankaja Munde)
गेल्या काही दिवासांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारल्यास त्या जेव्हा जाईल तेव्हा नाव सांगितले जाईल. भारतीय जनता पार्टीने काय निर्णय घ्यावा, हे वरिष्ठ नेते ठरवतात, असं ते म्हणाले.
पेपरफुटीवर काय म्हणाले?
निश्चित कडक कारवाईची गरज होती, तीन वर्षाची शिक्षा केली असेल तर या गुन्ह्यात सहज जामीन मिळणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. घटना एका ठिकाणी घडली तरी त्याचा सर्व व्यापी परिणाम मानसिकतेवर होतो. या संदर्भातल्या कायद्याचं स्वागत करायला पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मविआने जनतेला फसवलं- चंद्रशेखर बावनकुळे
मविआने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं. आदिवासी जनतेला फसवलं, महिलांना फसवलं.. अशा अनेक विषयातून महाविकास आघाडीने मत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वचन दिल्यानुसार काम करतील. त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल. केंद्रातील आणि राज्यातील सरकारी का विचाराचा असेल तर राज्यातील जनतेला फायदा होतो. केंद्रातील सरकार आताचे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास सकाळी सरकार येणार म्हणजे केंद्रातली काम पूर्ण पणे बंद करणे. महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल. ते फक्त केंद्राच्या योजना थांबवण्याचे काम करते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.