Lalu Prasad Yadav : कुंभ फालतू आहे, त्याला काही अर्थ आहे का? लालू प्रसाद यांचं वक्तव्य
Lalu Prasad Yadav : कुंभ फालतू आहे, त्याला काही अर्थ आहे का? लालू प्रसाद यांचं वक्तव्य

Lalu Prasad Yadav : कुंभ मेळ्यात गर्दी वाढत आहे. त्याच्यामुळे काही दुर्घटना घडत आहेत, असा सवाल पत्रकारांनी राजद चे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना विचारला होता. यावर बोलताना लालू प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "कुंभ फालतू आहे, त्याला काही अर्थ आहे का?", असं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांनी केलं आहे.
View this post on Instagram
लालू प्रसाद यादव म्हणाले, दिल्लीतील चेंगराचेंगरीची घटना अतिशय दु:खद आहे. आम्ही सर्वांना श्रद्धांजली अर्पित करतो. या रेल्वेच्या चुका आहेत. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडलीये. याचं आम्हाला दु:ख आहे. हे रेल्वेचं अपयश आहे. रेल्वे मंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
नवी दिल्लीतील रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी रेल्वेमंत्र्यांनी घ्यावी - लालू यादव
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेसाठी रेल्वेच्या गलथान कारभाराला जबाबदार धरत मृतांप्रती शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, मला या घटनेचे अत्यंत दु:ख झाले आहे, मात्र त्याची जबाबदारी रेल्वेमंत्र्यांनी घ्यावी.
View this post on Instagram
लालू कुटुंबीय कुंभस्नानाला जात नसल्याने विरोधकांकडून टीका
आत्तापर्यंत 50 कोटींहून अधिक लोकांनी प्रयागराज त्रिवेणीत पवित्र कुंभस्नान केले आहे. आजही लाखो भाविक दररोज कुंभस्नान करत आहेत. सर्वसामान्यांपासून ते देशातील खास व्यक्तींपर्यंत सर्वजण कुंभस्नानासाठी उत्सुक असतात. पण, लालू कुटुंबीय कुंभस्नानाला जात नसल्याबद्दल विरोधक सतत प्रश्न विचारत आहेत. त्याचबरोबर कुंभस्नानाबाबत लालू यादव यांच्या वक्तव्यानंतर देशाचं राजकारण तापलंय. लालू कुटुंबीयही खूप धार्मिक असल्याचं म्हटलं जातं, पण कुंभस्नानाबाबतचं त्यांच्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटू शकतं.
LaluPrasad Yadav on KumbhMela | कुंभ म्हणजे फालतू, लालूप्रसाद यादव यांचं वक्तव्य ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
