एक्स्प्लोर

Video : जयंतरावांशी दादांचं गुफ्तगू, संजय राऊतांना हस्तांदोलन; मतदानावेळी अजित पवारांच्या भेटीत काय घडलं?

सकाळचा भोंगा म्हणून नेहमीच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जाते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडूनही नाव न घेता संजय राऊतांवर असाच हल्लाबोल केला जातो.

मुंबई : लोकसभा निवडणुकानंतर राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जांगासाठी आज आमदारांचं मतदान सुरू आहे. दुपारी 1.30 वाजेपर्यंत 246 मतदान झाले असून या मतदानावेळी राजकीय नेत्यांच्या हसतखेळत गप्पा पाहायला मिळाल्या आहेत. विधानभवनात (Vidhanbhavan) मतदानासाठी आलेल्या आमदारांनी एकमेकांना भेटून हसत-खेळत गप्पा मारल्यानंतर या भेटीचे व्हिडिओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार (Ajit pawar) यांनी जयंत पाटलांशी (Jayant Patil) मत हातात हात देऊन गप्पा मारल्या आहेत. तर, संजय राऊत आणि अजित पवारांचं हस्तांदोलनही अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. दररोज एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) चक्क उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात हात घातल्याचं पाहायला मिळालं. 

सकाळचा भोंगा म्हणून नेहमीच शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जाते. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडूनही नाव न घेता संजय राऊतांवर असाच हल्लाबोल केला जातो. मात्र, जेव्हा हे नेते समोरासमोर येतात तेव्हा हसत खेळत हस्तांदोलन करतात, एकेमकांशी गप्पा मारत असतात, हे वास्तव आहे. विधानपरिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून या मतदानावेळी असे अनेक प्रसंग, क्षण पाहायला मिळाले आहेत. अजित पवार यांचा संजय राऊतांसमवेतच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला असून अजित दादांनी संजय राऊतांना दोन हातांनी हस्तांदोलन केल्याचं दिसून आलं. तर, जयंत पाटील यांच्याशी काही क्षण थांबून अजित पवारांनी गुप्तगू केल्याचं दिसून आलं. विधानपरिषदेतील या दोन्ही भेटीवरुन राजकीय अर्थ लावले जात आहेत. मात्र, ही केवळ अनावधानाने झालेली भेट असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. 

व्हिडिओ : https://youtube.com/shorts/kI9KLJBFOaM?si=bdCvWCfMgpqUJXIs

संजय राऊत- चंद्रकांत पाटलांची भेट

संजय राऊत आणि चंद्रकांत दादा पाटील यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली. त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले मी तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो. तर, अरे व्वा..आपण परत एकत्र यायलाच पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे, संजय राऊतांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आमच्या गाठीभेटी होतच असतात. आम्ही दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही अशाप्रकारे भेटतच असतो, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. 

हेही वाचा

गणपत गायकवाडांच्या मतदानावरुन वाद पेटला, बटीक, सालदार अन् गडी म्हणत अंबादास दानवेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget