एक्स्प्लोर

''हा कायदा डाव्या विचारांच्या विरुद्ध नाही, स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये यासाठी''; जनसुरक्षा विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले...

जनसुरक्षा विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  हा कायदा डाव्या विचारांच्या विरुद्ध नाही.

मुंबई: राज्यातील नक्षलवाद संपविण्याच्या दृष्टीकोनातून महायुती सरकारने बहुचर्चित राज्य जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडले. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर बहुमताने मंजूर करण्यात आलं. या विधेयकाला विरोध करत डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी विरोधात मतदान केले. या बिलाचा (Bill) गैरफायदा होऊ शकतो म्हणून मी या बिलाला विरोध करतो, असे विनोद निकोले यांनी म्हटले. मात्र, हा कायदा डाव्या विचारांच्या (Naxal) विरुद्ध नाही. माझं स्वातंत्र्य इतरांच्या स्वातंत्र्याला घाला घालत असेल तर त्यासाठी हा कायदा आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये यासाठीच हा कायदा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विधेयकावरील चर्चेदरम्यान म्हटले. तब्बल 12,500 सूचनांचा अभ्यास करुन राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं होतं. ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. 

जनसुरक्षा विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  हा कायदा डाव्या विचारांच्या विरुद्ध नाही. भाकप, माओवादी हा पक्ष 2009 साली बॅन झाला. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी हा पक्ष बॅन केला. नरसंहार केला म्हणून युएपीएमध्ये ही संघटना बॅन केली, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांबाबत आम्हालाही आदर आहे. पण, डाव्या विचारांच्या पक्षाविरुद्ध हा कायदा नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शिक्षक, विद्यार्थ्यांनी आंदोलने केली म्हणून हा कायदा लागणार नाही, हा कायदा व्यक्ती नाही तर संघटनेच्याविरुद्ध आहे. कायदा संपूर्ण वाचावा लागेल, जर संघटनेचे उद्दिष्ट नुकसान पोहोचवणे असेल तर बंदी लागेल, असेही फडणवीसांनी म्हटले. आम्ही अनेक वर्षे विरोधात काढली, तुम्हाला माहितीये मी विरोधी पक्षात खतरनाक आहे, म्हणून मला इथेच राहू द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी विरोधकांना मिश्कील टोला लगावला. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावरुन मुख्यमंत्र्‍यांनी निशाणा साधला. 

माझं स्वातंत्र्य इतरांच्या स्वातंत्र्याला घाला घालत असेल तर त्यासाठी हा कायदा आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये यासाठीच हा कायदा आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात बोलताना म्हटले. इतर 4 राज्यात कडक कायदा असूनही त्यांच्याकडून 48 संघटना बॅन करण्यात आल्या आहेत. एखाद्या चळवळीला पैसा पुरवण्यात काही गैर नाही, पण संघटना देशविरोधी हालचाल करणार असल्याचे माहिती असूनही पैसा दिला तर कारवाई होणारच. फेक न्यूज फॉरवर्ड करणारा आणि जनरेट करणारा दोन्ही दोषी आहेत. मात्र, त्यांना हा कायदा लागू होणार, पण एखादी संघटना, संविधान आणि संवैधानिक संस्थांच्या विरोधात बंड पुकारण्यास सांगत असेल तेव्हा कायदा लागू होईल, असेही मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट सांगितले. आम्हाला हा कायदा लादायचा नाही, सरकार विरुद्ध बोलण्याच्या अधिकारावर घाला येणार नाही. पण, संवैधानिक संस्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात हा कायदा आहे. आम्ही या कायद्याचा गैरवापर करणार नाही, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. 

सुधीर मुनगंटीवारांना मोठी जबाबदारी देऊ

मी सुधीर भाऊंचे आभार मानतो, आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंच स्थान आहे, त्यांना योग्य आणि वरची जागा देऊ, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी भरसेभत दर्शवलेल्या नाराजीवरुन मुख्यमंत्र्‍यांनी त्यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे सूतोवाच केले. त्यावर, त्यांना फार वरची जागा देऊ नका, असे विधानसभा अध्यक्षांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. 

हे विधेयक शुद्ध भावनेनं आलेलं नाही - दानवे

जनसुरक्षा विधेयक हे बिल शुद्ध भावनेने आलेले नाही. आपल्या राज्यात अनेक कायदे आहेत, त्यामुळे या कायद्याची गरज नाही. अर्बन नक्षल हा नवीन शब्द या कायद्यात वापरला जातोय, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

या बिलाचा गैरफायदा होऊ शकतो म्हणून विरोध : विनोद निकोले

डाव्या पक्षाचा मी एकच आमदार आहे. हिंसक कारवाईला आळा घातला पाहिजे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी व्यक्त केले. मकोका कायदा आहे, युएपीए कायदा आहे. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवला आहे,  पण या बिलाचा गैरफायदा होऊ शकतो म्हणून मी या बिलाला विरोध करतोय असे निकोले म्हणाले. 

हेही वाचा

पुण्यातील हिंजवडीबाबत सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं, आमदार लांडगेंनी सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
Rishabh Pant Ind vs SA : ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य
ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादी सत्तेशिवाय तडफडणारा मासा', Shiv Sena च्या Tanaji Sawant यांची जहरी टीका
Big Blow: 'माझ्याबरोबर जिल्ह्यातील कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करतील'- Shivaji Sawant
Maharashtra Politics : Sunil Mane आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांचा BJP मध्ये प्रवेश
Political Earthquake: आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांच्या बंधूचा BJP मध्ये प्रवेश निश्चित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Election 2025: नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
नामांकन दाखल करण्याची मुदत एक दिवसावर, पण बुलढाण्यात एकाही पक्षाचा उमेदवार ठरेना, आज मोठ्या राजकीय घडामोडी
Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
ताडोबाच्या 'चंदा' आणि 'चांदणी' वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा कडाडून विरोध; 'सह्याद्री'तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
Rishabh Pant Ind vs SA : ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य
ऋषभ पंतला मानलं, दुखापत होऊनही पुन्हा मैदानात उतरला अन् आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, समोर ठेवले इतक्या धावांचे लक्ष्य
Maharashtra Weather News: राज्यात पावसाची शक्यता धूसर; तापमानात घट, काही दिवसात थंडी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज
राज्यात पावसाची शक्यता धूसर; तापमानात घट, काही दिवसात थंडी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज
DSP Richa Ghosh : टीम इंडियाला मिळाली नवी DSP! सिराज-दीप्ती शर्मानंतर वयाच्या 23 वर्षीय ऋचा घोषही पोलीसांच्या वर्दीत दिसणार
टीम इंडियाला मिळाली नवी DSP! सिराज-दीप्ती शर्मानंतर वयाच्या 23 वर्षीय ऋचा घोषही पोलीसांच्या वर्दीत दिसणार
Nanded Crime News : क्रुरतेचा कळस! 6 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार; नांदेडच्या मुखेडमधील संतापजनक घटना
क्रुरतेचा कळस! 6 वर्षीय चिमुकलीवर 22 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार; नांदेडच्या मुखेडमधील संतापजनक घटना
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Embed widget