एक्स्प्लोर

Badlapur School case: भाजप विरोधी पक्षात असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचं राजकारण केलं नसतं, पंकजा मुंडेंनी विरोधकांना सुनावलं

Badlapur Crime: यापूर्वी निर्भया घडलंय, आता बदलापूर प्रकरण घडलंय. वेळोवेळी अशा घटना घडत आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणावरुन राजकारण करण्याची गरज नव्हती, असे मत विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

पंढरपूर: भाजप  पक्ष विरोधी पक्षात असता तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राजकारण केले नसते, असे वक्तव्य विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय पंढरपुरात काल विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी बदलापूर प्रकरणाबाबत विरोधकांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांनी विरोधकांना बदलापूर प्रकरणावरुन खडे बोल सुनावले की, गेल्या दशकभरात महिला अत्याचाराच्या अत्यंत निर्घृण आणि क्रूर घटना घडत आहेत. निर्भयापासून बदलापूरपर्यंत अत्याचार घटनांमध्ये क्रूरता वाढत आहे. यामध्ये दशकभरात वेगवेगळ्या लोकांनी वेळोवेळी भूमिका बजावल्या आहेत. या घटनेत राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळली पाहिजे. आपण विरोधक असतो तर अशा घटनेचे राजकारण केले नसते अशा शब्दात विरोधकांचे कान टोचले. तसेच अशा घटनातील आरोपींना नराधमांना चौकात आणून शिक्षा दिली पाहिजे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडित मुलीच्या पालकांची तक्रार दाखल करण्यात पोलिसांनी दिरंगाई  केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांना तब्बल 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. यावरुन गृह मंत्रालय आणि राज्य सरकारच्या कारभारावर विरोधक ताशेरे ओढत आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. 

रावसाहेब दानवेंनी शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरुन विरोधकांना फटकारले

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मविआचे नेते बुधवारी राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार  राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना फटकारले आहे. कंत्राटदाराने काळजी घ्यायला हवी, ती घेण्यात आली नाही. ही दुर्दैवी घटना आहे. आशिष शेलार यांनी माफी मागितली आहे. राज्यात जेवढे पुतळे आहे त्याचे ऑडिट झाले पाहिजे. ठाकरे आणि राणेंचा राडा काही नवीन नाही. दोघांना सुद्धा माहीत आहे राडे कसे करावेत. दोघे पण एक पक्षाचे होते. राणेंना कोणी बोललं तर ते उत्तरही तसंच देणार.  त्यांचा वक्तव्याचा विपर्यास करू नये, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. 

आदित्य ठाकरे यांचे ठरलेले शब्द आहेत. ते विकासावर बोलत नाहीत. ते अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्यावर बोलत आहे. शिवाजी महाराज अस्मितेचा विषय आहे, त्यावर राजकारण करू नये. केसरकर यांच्या बोलण्याचा अर्थ याच्यापेक्षा चांगला पुतळा बसवू, असा असू शकतो. त्याचा अर्थ उलटा घेऊ नका, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

आणखी वाचा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पोलिसांच्या चुकीच्या FIR मुळे आरोपीला फायदा, असीम सरोदेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारतRajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget