एक्स्प्लोर

High Court Manoj Jarange Patil Mumbai Morcha मोठी बातमी : आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या, हायकोर्टाचे मनोज जरांगेंना निर्देश

High Court Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे.

High Court Manoj Jarange Patil Mumbai Morcha मुंबई: ऐन गणपतीच्या तोंडावर मुंबईत धडकणारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मोर्चा रोखण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रयत्न करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली. परंतु मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत. मुंबईसाठी आम्ही रवाना होणारचं असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आज (26 ऑगस्ट) मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.  मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 

उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे काय म्हणाले?

उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार, न्यायदेवतेचं पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. जनतेचं गाऱ्हाण न्यायदेवता ऐकेल, असंही मनोज जरांगे म्हणाले. लोकशाही मार्गाने जनता आंदोलन करु शकते. संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करतो आहे. मी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर येणार आहे. उद्या 10 वाजता आम्ही सगळे मराठे मुंबईकडे कूच करतोय. हा सरकारचा खेळ आहे, न्यायदेवतेचा नाही.  रास्त मागण्या आहेत. कायद्याला धरुन आंदोलन आहे, म्हणून पोटदुखी आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

- अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार...

- अंतरवाली - पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

- 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर...28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

- 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार...

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; बैठकीत नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On E-Challan: गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करुन टाकली, सभागृहात काय घडलं?
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
निवडणुकीतील भाषणं अंगलट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
Embed widget