एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; बैठकीत नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil And Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली.

Manoj Jarange Patil And Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सण साजरा होतो. अशात, गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होताना दिसू शकेल. त्यातच मनोज जरांगे आंदोलनसाठी मुंबईत दाखल झाल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. याचदरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईतील मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतरही मनोज जरांगे मुंबईतील मोर्चावर ठाम आहेत. मोर्चा काढणारचं असा मोठा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. 

मनोज जरांगे काय म्हणाले?

राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर देखील मनोज जरांगे मुंबईतील मोर्चावर ठाम आहेत. अजून बोललोच नाही. तुमच्या समोरच चर्चा करणार, असं मनोज जरांगेंनी सांगितले. एक रस्ता आम्हाला द्या..कोणताही द्या...हजार रस्ते आहेत. एक द्या..मी मोर्चावर ठाम..अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. माझ्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चर्चा नाही, अंमलबजावणी करा..., असं मनोज जरांगे म्हणाले.  तीन महिन्यांचा वेळ द्या म्हणाले होते. परंतु उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. 

देवेंद्र फडणवीसांचे विशेष कार्यकारी अधिकारी काय म्हणाले?

उद्या राज्यभरात गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या धामधुमीचे असतील. या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी स्वत:हून पुढे टाकले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो, असे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी सांगितले.

ओएसडींच्या भेटीनंतर मनोज जरांगे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आणि कुणबी एक आहेत, याचे सरकारी दस्ताऐवज सापडले आहेत. 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा आरक्षणासाठी रोडमॅप वगैरे कशाला हवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरुन टाकतो. त्यांनी कधी इतकी फुलं बघितली नसतील, वास मारणारी, बिगरवासाची सगळी फुलं आणतो. फडणवीस साहेबांचा बंगला नाय गुलाबाच्या पाकळ्यांनी भरुन काढला तर नाव बदलेन माझं.  उगाच गोरगरीबांच्या लेकरांची का नाराजी घेता? मला जेलला टीका, मी सडायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्हाला आरक्षण देतो, तुमच्या अंगावरचं कातडं काढून द्या, तरीही मी तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

- अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार...

- अंतरवाली - पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

- 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर...28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

- 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार...

संबंधित बातमी:

Manoj Jarnage Patil & Devendra Fadnavis: मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी मनोज जरांगेंच्या भेटीला, मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलणार?

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Supriya Sule On NCP Merger: सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!
सुनेत्रा पवारांनी सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको; आता सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाचा विषय संपवून टाकला!
Rohit Pawar On Ajit Pawar : अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?
अजितदादांच्या अपघातामागील लोकांना वाचवणारा मफलरवाला नेता कोण? 16 तारखेला राजकीय बॉम्ब फुटणार? रोहित पवार पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Embed widget