...तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर हसन मुश्रीफ काय म्हणाले?
Hasan Mushrif on Dhananjay Munde, Kolhapur : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत असून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून होतं आहे.
Hasan Mushrif on Dhananjay Munde, Kolhapur : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. शिवाय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी देखील विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबत आता मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलंय. "मी अनेक वेळा सांगितलं आहे की, आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही. तोपर्यंत कोणी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही", असं मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले. ते कोल्हापुरातील (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस देशमुख हत्या प्रकरणाचा पर्दाफाश करतील
हसन मुश्रीफ म्हणाले, धनंजय मुंडेंना भाजप टार्गेट करते असा काही प्रश्न नाही. सुरेश धस यांचा प्रश्न वेगळा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस योग्य ती कारवाई करतील. सुरेश धस यांनी आरोप केले त्यावेळी मी विधानसभेत उपस्थित होतो आणि त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलेला आहे. भाजप टार्गेट करत आहे असं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशी करतील. देवेंद्र फडणवीस कार्यक्षम मुख्यमंत्री लाभलेले आहेत ते तात्काळ याचा शोध घेऊन पर्दाफाश करतील. जोपर्यंत कोणी दोषी असेल असं आढळून येत नाही, तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नाही.
सीपीआर चा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला दिसेल
सीपीआर चा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला दिसेल. सीपीआरमधील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे.. आयुक्तांच्या अधिकाऱ्यास कमिटी नेमली होती त्याचा रिपोर्ट आलेला आहे कारवाई होईल. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणालाही अभय मिळणार नाही. विशाल एंटरप्राइजेस संदर्भात यासाठी नेमलेली आहे, चौकशी सुरू आहे. शेंडा पार्कतील दोन इमारतीचा पूर्ण काम पूर्ण झालेला आहे उर्वरित 10 इमारतीच मार्चपर्यंत होते.
महिला वसतिगृहाच काम चालू आहे. 150 मुलींसाठी क्षमता असलेलं वसतिगृह आहे. 150 बीएससी परिचारिकेचे वसतिगृह आणि न्याय वैद्यकशास्त्र इमारत आणि बॅडमिंटन कोर्टचं काम देखील यामध्ये हाती घेण्यात आलेले आहे. 175 कोटींची काम आहेत. दोन वर्षात पूर्णपणाने होतील आणि काम आहे ते अद्याप सुरू झालेलं नाही. मंगळवारी मी मंत्रालयामध्ये बैठक बोलवलेली आहे. ते लवकरात लवकर ते काम होऊन ते 1100 काम दोन अडी वर्षात पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा