Gita Press: 'गीता प्रेसला पुरस्कार देणं म्हणजे गोडसेला पुरस्कार देण्यासारखं', जयराम रमेश यांच्या ट्विटवर काँग्रेस नाराज?
Gita Press Awarded Gandhi Peace Prize: गोरखपूर येथील गीता प्रेसची स्थापना 1923 साली झाली. गीता प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे.
![Gita Press: 'गीता प्रेसला पुरस्कार देणं म्हणजे गोडसेला पुरस्कार देण्यासारखं', जयराम रमेश यांच्या ट्विटवर काँग्रेस नाराज? gita press awarded gandhi peace prize jairam ramesh compare with godse savarkar but congress not happy Gita Press: 'गीता प्रेसला पुरस्कार देणं म्हणजे गोडसेला पुरस्कार देण्यासारखं', जयराम रमेश यांच्या ट्विटवर काँग्रेस नाराज?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/19/947e40cda0a1550957773b2695ebc20c1687156513380131_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gita Press Awarded Gandhi Peace Prize: गीता प्रेस गोरखपूरला गांधी शांतता पुरस्कार 2021 प्रदान करण्यात येणार आहे. गांधी शांतता पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा वार्षिक पुरस्कार आहे. 1995 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आदर्शांना आदरांजली म्हणून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे. जयराम रमेश यांच्या या ट्विटमुळे काँग्रेस पक्ष नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देण्यास जयराम रमेश यांनी विरोध केला आहे. त्यांनी गीता प्रेसला मिळालेल्या गांधी शांतता पुरस्काराची तुलना सावरकर आणि गोडसे यांच्याशी केली.
जयराम रमेश यांच्या ट्विटशी काँग्रेस सहमत का नाही?
जयराम रमेश यांनी ट्विट केलं की, "2021 चा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूर येथील गीता प्रेसला प्रदान करण्यात आला आहे, जे यावर्षी आपली शताब्दी साजरी करत आहे. अक्षय मुकुल यांचे 2015 चे उत्कृष्ट चरित्र आहे, ज्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींबद्दल लिहिलं आहे. वादळी संबंध आणि त्यांच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक अजेंडांवर त्यांच्याशी सुरू असलेल्या लढाया, या सर्वावर लिखाण आहे. हा निकाल खरं तर फसवणूक करणारा आहे आणि सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखा आहे."
गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्काराच्या निषेधार्थ जयराम रमेश यांच्या ट्विटशी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते सहमत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, जयराम रमेश यांचे गीता प्रेसबाबतचे वक्तव्य अनावश्यक आहे. हिंदू धर्माच्या प्रचारात गीता प्रेसचा मोठा वाटा आहे. जयराम रमेश यांनी असं विधान करण्यापूर्वी अंतर्गत चर्चा करायला हवी होती, असं त्यांचं म्हणणं आहे.
The Gandhi Peace Prize for 2021 has been conferred on the Gita Press at Gorakhpur which is celebrating its centenary this year. There is a very fine biography from 2015 of this organisation by Akshaya Mukul in which he unearths the stormy relations it had with the Mahatma and the… pic.twitter.com/PqoOXa90e6
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 18, 2023
गीता प्रेसला होत आहेत 100 वर्षे पूर्ण
गोरखपूर येथील गीता प्रेसची स्थापना 1923 साली झाली. गीता प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. 16.21 कोटी श्रीमद भगवद्गीता पुस्तकांसह 14 भाषांमध्ये 41.7 कोटी पुस्तके येथे प्रकाशित झाली आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने कधीही पैसे मिळवण्यासाठी आपल्या प्रकाशनांच्या जाहिराती घेतल्या नाहीत.
गांधी शांतता पुरस्कारासोबतच गीता प्रेसला एक कोटी रुपयांचा मानधन देण्यात येणार आहे. मात्र गीता प्रेस व्यवस्थापनाने एक कोटीचे मानधन स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे गीता प्रेसचे व्यवस्थापक डॉ.लालमणी तिवारी यांनी सांगितले.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)