(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi On Employment: 'हा अमृतकाळ आहे?' रोजगारीच्या मुद्यावर राहुल गांधींचा सरकारवर निशाणा म्हणाले...
Rahul Gandhi On Employment: रोजगारीच्या मुद्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी होणाऱ्या रोजगाराच्या मुद्यावर ट्विट केले आहे.
Rahul Gandhi On Employment: सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी झालेल्या रोजगाराच्या संधीच्या मुद्द्यावरुन ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कमी झालेल्या रोजगारावरुन केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
'सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार हा भारतात अभिमान असायचा आणि रोजगारासाठी प्रत्येक तरुणाचे स्वप्न असायचे. पण, आज सरकारचे प्राधान्य या गोष्टी नाहीत. देशातील सार्वजनिक उपक्रमांमधील रोजगार 2014 मध्ये 16.9 लाखांवरून 2022 मध्ये केवळ 14.6 लाखांवर आला आहे. प्रगतीशील देशात नोकऱ्या कमी होतात का?' असा सवाल देखील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
'BSNL मध्ये 1,81,127 नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तर SAIL मध्ये 61,928, MTNL मध्ये 34,997, SECL मध्ये 29,140, FCI मध्ये 28,063, ONGC मध्ये 21,120 नोकऱ्या कमी झाल्या आहेत. तर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांची खोटी आश्वासने देणाऱ्यांनी नोकऱ्या वाढवण्याऐवजी दोन लाखांहून अधिक नोकरदारांना काढून टाकले आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
पीएसयू भारत की शान हुआ करते थे और रोज़गार के लिए हर युवा का सपना हुआ करते थे। मगर, आज ये सरकार की प्राथमिकता नहीं हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2023
देश के पीएसयू में रोज़गार, 2014 में 16.9 लाख से कम हो कर 2022 में मात्र 14.6 लाख रह गए हैं। क्या एक प्रगतिशील देश में रोज़गार घटते हैं?
BSNL में 1,81,127…
मणिपूर हिंसाचारावर राहुल गांधींची प्रतिक्रिया
याआधी राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, भाजपाच्या द्वेषाच्या राजकाराणामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार होत आहे. या हिंसाचारामध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी देशाला अपयशी ठरवले असून आता ते यावर मौन बाळगून आहेत. हिंसाचाराचे हे चक्र संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवले पाहिजे' पुढे लिहितांना राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, 'मणिपूरमध्ये द्वेषाचे दुकान बंद करुन, प्रेमाचे दुकान सुरु करुया.'
BJP’s politics of hatred has burnt Manipur for over 40 days leaving more than a hundred people dead.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2023
The PM has failed India and is completely silent.
An all-party delegation must be sent to the state to end this cycle of violence & restore peace.
Let’s shut this ‘Nafrat ka…