एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Parishad Voting : गणपत गायकवाड जेलमध्ये, शहाजीबापू रुग्णालयात, महायुतीची दोन मते कुणाचं गणित बिघडवणार?

Ganpat Gaikwad Voting Maharashtra Vidhan Parishad Election : भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करु देऊ नये यासाठी काँग्रेसनं लोकप्रतिनिधी कायद्याचा दाखला देत आक्षेप घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024)11 जागांसाठी मतदान होणार आहे. अकरा जागांसाठी  12 उमेदवार रिंगणात असल्यानं एका एका आमदाराचं मत महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी केली आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) तुरुंगात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखावं, असं काँग्रेसनं पत्र लिहिलं आहे. एक एक मत जुळवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखावं, असं पत्र लिहिलं आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) रुग्णालयात आहेत. शहाजीबापू पाटील हे आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहाजीबापू पाटील मतदानाला येणार का? ते आले तर या मताचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होऊ शकतो.  

काँग्रेसचा गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप

भाजपचे आमदार गणपत गायकवाड सध्या पोलीस स्टेशनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यामुळं गणपत गायकवाड अटकेत आहेत. आज विधानपरिषद निवडणुकीत त्यांना मतदान करु देऊ नये, असं पत्र काँग्रेसनं लिहिलं आहे.  महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर  गणपत गायकवाड अटकेत आहेत. 

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करुन देऊ नका, अशी मागणी काँग्रेसच्यावतीनं करण्यात आली आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो न्याय अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना लावण्यात आला त्या प्रमाणं यावेळी देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करु देऊ नका अशी मागणी केली जात आहे.  काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्यावतीनं हा आक्षेप घेण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचं  

विधानसभेतील आमदारांमधून विधानपरिषदेवर 11 आमदार निवडून द्यायचे आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या 274 आमदार आहेत. त्यामुळं विधानसभेच्या आमदाराच्या एका एका मताला महत्त्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवाराचा कोटा 23 इतका निश्चित करण्यात आला आहे. 

गणपत गयाकवाड यांना मतदानाला नेण्यासाठी पोलीस निघालेले आहेत. काँग्रेसनं याच पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहेत. पोलीस गणपत गायकवाड यांना तळोजा तुरुंगातून मतदान करण्यासाठी घेऊन निघाले आहेत. गणपत गायकवाड यांच्या मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी घेतली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. गणपत गायकवाड पुढच्या तासाभरात ते मतदानासाठी येतील आणि मतदान करतील, अशी शक्यता आहे. 

निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार गणपत गायकवाड यांचं जर मतदान यादीत नाव असेल तर त्यांना मतदान करता येईल. गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द झालेली नाही किंवा कोर्टाने अद्याप सजा सुनावलेली नाही.त्यामुळे त्यांना मतदान करता येईल .तरीही राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार असल्याची माहिती आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार

भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत 
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे 
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर 
काँग्रेस : प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पुरस्कृत : जयंत पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : मिलिंद नार्वेकर   

संबंधित बातम्या :

विधानपरिषदेत कुणाचे वाजणार 'बारा', किचकट राजकीय गणितात कोण कुणाला शह देणार? आज फैसला
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP MajhaTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 PmVidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget