एक्स्प्लोर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात; फेसबुकवर पोस्ट करत स्वतःच केली घोषणा, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार?

Sanjay Pandey Will Contest Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत.

Sanjay Pandey Will Contest Versova Assembly Election 2024 : मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीदेखील सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट करत स्वतः संजय पांडे यांनी वर्सोवातून विधानसभा निवडणूक (Versova Assembly Election 2024) लढवणार असल्याची घोषणा केल्याची माहिती मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वतः आपल्या उमेदवारीबाबत घोषणा केली. मात्र, कोणताही पक्ष सोबत नाही, असंदेखील संजय पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, काल (रविवारी) संजय पांडे यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात नतमस्तक होतं प्रचाराला सुरूवात केली आहे. 

आपल्या उमेदवारीबाबत घोषणा करताना संजय पांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, "आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू..." 

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडेंना झालेली अटक, प्रकरण काय?

संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास आठ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता. याचप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.  

संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलेला. तसेच, NSE सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आलेलं. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. तसेच, संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केलं. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केलेली. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sa 1st Test : टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना भेटला, पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचं सांगितलं, पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन्...
लग्नात देवेंद्र फडणवीसांसोर स्वत:चा सत्कार करुन घेतला, तितक्यात पोलिसांना संशय आला अन्...
IND vs PAK Asia Cup Rising Stars: कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
Mahesh Babu Son Gautam: महेश बाबू, नम्रता शिरोडकरच्या लेकाला पाहिलंत? अगदी वडिलांची कार्बन कॉपी, विश्वास बसत नसेल, तर तुम्हीच पाहा!
महेश बाबू, नम्रता शिरोडकरच्या लेकाला पाहिलंत? अगदी वडिलांची कार्बन कॉपी, विश्वास बसत नसेल, तर तुम्हीच पाहा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Sa 1st Test : टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
टीम इंडियावरच 'तो' डाव उलटला, सामन्यापूर्वी गंभीर अन् पीच क्युरेटरच्या भांडणाची चर्चा, सौरव गांगुली संतापला, म्हणाला...
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना भेटला, पंतप्रधान कार्यालयाचा सचिव असल्याचं सांगितलं, पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन्...
लग्नात देवेंद्र फडणवीसांसोर स्वत:चा सत्कार करुन घेतला, तितक्यात पोलिसांना संशय आला अन्...
IND vs PAK Asia Cup Rising Stars: कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
कॅच पकडूनही नॉट-आउट दिले, सगळे अंपायरच्या अंगावर धावले, नको नको ते बोलले; भारत-पाकिस्तानच्या सामन्यात कधीही न पाहिलेला राडा!
Mahesh Babu Son Gautam: महेश बाबू, नम्रता शिरोडकरच्या लेकाला पाहिलंत? अगदी वडिलांची कार्बन कॉपी, विश्वास बसत नसेल, तर तुम्हीच पाहा!
महेश बाबू, नम्रता शिरोडकरच्या लेकाला पाहिलंत? अगदी वडिलांची कार्बन कॉपी, विश्वास बसत नसेल, तर तुम्हीच पाहा!
Riya Patil : कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
कोल्हापूरच्या रिया पाटीलची धडाकेबाज कामगिरी, हैदराबाद नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, महाराष्ट्राचे खाते उघडले
Bollywood Movie Tragic Ending: बॉलिवूडचा असा सिनेमा, ज्यामुळे आयुष्य संपवायला लागलेली प्रेमी युगुलं; अगदी राज कपूर यांनीही शेवट बदलण्याची केलेली शिफार, अन् मग
बॉलिवूडचा असा सिनेमा, ज्यामुळे आयुष्य संपवायला लागलेली प्रेमी युगुलं; शेवट बदलण्याची केलेली शिफार, पण मग...
IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का
एकटा वैभव सूर्यवंशी लढला, भारताचे इतर फलंदाज अन् गोलंदाज फेल, अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय
Mumbai CNG Cut: मुंबईत CNG गॅसचा तुटवडा, रिक्षा-कॅब वाहतूक ठप्प होण्याची शक्यता, खासगी वाहनधारकही चिंतेत
मुंबईत CNG गॅसचा तुटवडा, रिक्षा-कॅब वाहतूक ठप्प होण्याची शक्यता, खासगी वाहनधारकही चिंतेत
Embed widget