एक्स्प्लोर
Farm Loan Politics: 'सरकार मोगलांहून अधिक वागतंय', मनोज जरांगेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल
शेतकरी कर्जमाफीसाठी (Farmer Loan Waiver) सरकारने 30 जून 2026 ची मुदत दिल्याने मराठा नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'सरकार मोगलांहून अधिक वागतंय,' असा घणाघात करत जरांगे यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. ही डेडलाईन म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, तोपर्यंत अनेक शेतकरी मरण पावतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची आजची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, सहा महिन्यांनी मिळणाऱ्या मदतीचा काहीही उपयोग होणार नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. उशिरा मिळणाऱ्या न्यायावर बोलताना त्यांनी न्यायदेवतेवर विश्वास असल्याचेही स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















