एक्स्प्लोर

Nashik Crime: निवडणुकीची चाहूल लागताच मालेगावात खळबळजनक घटना, कोऱ्या करकरीत बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Crime: नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत.

Nashik Crime: नाशिक ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Police) कारवाईत मालेगाव (Malegaon) परिसरात 10 लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा (Fake Currency) जप्त करण्यात आल्या आहेत. ही मोठी कारवाई मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर केली. या प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Nashik Crime: गोपनीय माहितीद्वारे सापळा रचून कारवाई

मालेगाव पोलिसांना बुधवारी (दि. 29 ऑक्टोबर) गोपनीय माहिती मिळाली की, काही परप्रांतीय व्यक्ती बनावट चलनी नोटा विक्रीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी ए-वन सागर हॉटेलजवळ सापळा रचला. या वेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय 34, रा. मोमीनपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय 33, रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. 31, बुरहानपूर, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी 500 रुपयांच्या 2,000 बनावट नोटा (एकूण किंमत 10 लाख रुपये), दोन मोबाईल हँडसेट आणि एक सॅक असा मिळून 10 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Nashik Crime: मौलानाचाही सहभाग; आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय

ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे कार्य करतो, अशी माहिती समोर येत आहे. बनावट नोटांच्या मागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे आणि त्या कुठून आणल्या व कुठे विक्रीसाठी नेल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच बनावट नोटांचा मोठा साठा जप्त झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

Nashik Crime: आठ दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 179, 180 आणि 3(5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या कालावधीत बनावट चलन रॅकेटचे मूळ आणि जाळे शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Nashik Crime: यांनी केली कारवाई

ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीर संधू आणि पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रीती सावंजी, पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, शिपाई गणेश जाधव आणि मोरे यांनी सहभाग घेतला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ
ग्रामसभेत राडा, शिवीगाळ अन् पाठलाग; तणावातून ग्रामसेवकाला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू, जळगावात खळबळ

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget