Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Ajit Pawar Meets Amit Shah : अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.
Ajit Pawar Meets Amit Shah : आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा 84 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासोबत शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची संसदेत भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने अजित पवार आणि अमित शाह यांची भेट महत्त्वाची मानली आहे. आता मंत्रिमंडळाचा नेमका विस्तार कधी होणार? याबाबत अजित पवार यांची महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
उसाच्या प्रश्नावर अमित शाह यांच्याशी चर्चा केली. उसाचा भाव वाढण्यासाठी आम्ही विनंती केली होती. यावर अमित शाह यांनी जानेवारीपर्यंत या विषयावर आपण निर्णय घेऊ असे सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाह यांच्याशी काही चर्चा झाली का? असे विचारले असता मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला पार पडणार का? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या भेटीबाबत अजित पवारांचं भाष्य
आज शरद पवार यांची अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. आम्ही त्यांचे दर्शन घेतले, चहा-पाणी झाले. सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या. आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमचं अधिवेशन कधी आहे? अशा चर्चा झाचे त्यांनी म्हटले आहे. राजकारणात टीका-टिप्पणी होत असते. पण, राजकारणाव्यतिरिक्त काही संबंध असतात. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रात कसे राजकारण करायचे ते शिकवले आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या