Dhananjay Munde on Bajrang Sonwane : आलिया नशिबी, जनतेला नरड्यातून रक्त येईपर्यंत सांगत होतो; धनंजय मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल
Dhananjay Munde on Bajrang Sonwane : मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज (दि. 20) बीड जिल्ह्यातील तीन शहरातल्या प्रमुख सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde on Bajrang Sonwane : मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज (दि. 20) बीड जिल्ह्यातील तीन शहरातल्या प्रमुख सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे. आलिया नशिबी... असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांना लक्ष केले आहे. विशाळगड प्रकरणात बजरंग सोनवणे यांची कथित ऑडिओ क्लिप सध्या जिल्ह्यात वायरल होत आहे. याच संदर्भात धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
कोणत्याही लोकप्रतिनिधीचा मालक हा जनता असते
धनंजय मुंडे म्हणाले, कोणत्याही लोकप्रतिनिधीचा मालक हा जनता असते, निवडून आल्यानंतर जनतेला असं म्हणायचं की जनता ही माझी मालक नाही. याचा प्रत्यय हा आज आला आहे. हा प्रत्येय मायबाप जनतेला कळालं आणि त्यामुळेच आम्ही जनतेला नरड्यातून रक्त येईपर्यंत सांगत होतो. पण आता ठीक आहे. आलिया नसीबी असं म्हणत मंत्री मुंडे यांनी खासदार सोनवणे यांच्यावर टीका केली आहे.
आम्ही 42 होतो, पण 49 झालोय, राहिलेल्या 7 जणांबाबत आपण चर्चा करत नाहीत
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, अतुल बेनके माझे विधीमंडळातील सहकारी आहेत. त्यांचे वडिल आणि शरद पवार साहेब यांचं नातं सपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचे राजकीय संबंध होते, मैत्री होती. त्यांचे चिरंजीव आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी आताच्या निवडणुकीत दाखवून दिलंय की, ते कोणासोबत आहेत. आम्ही 42 होतो, पण 49 झालोय. आता राहिलेल्या 7 जणांबाबत आपण चर्चा करत नाहीत. आपण ही चर्चा देखील केली पाहिजे.
वाघनखे महाराष्ट्रात आणून सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी खुली करण्याचा शब्द महायुती सरकारच्या वतीने दिलेला शब्द पूर्ण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे प्रतिक असलेली वाघनखे महाराष्ट्रात आणून सर्वसामान्य जनतेच्या दर्शनासाठी खुली करण्याचा शब्द महायुती सरकारच्या वतीने दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरमुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो, असेही मुंडे म्हणाले. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे साक्षीदार वाघनखे हा स्वाभिमानाचा, प्रेरणेचा विषय आहे, राजकारणाचा नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना करू द्या. गेली 70 वर्ष ती वाघनखे लंडनच्या म्युझिअम मध्ये होती, कोणी प्रयत्न केले नाही, असंही मुंडे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या