City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर सुपरफास्ट : 02 Jan ABP Majha
मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, कोकणातले माजी आमदार राजन साळवी यांचं स्पष्टीकरण, नाराजीच्या बातम्या अफवा असल्याचा दावा..
पुण्यातले ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर, विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर आणि प्राची आल्हाट पुढल्या आठवड्यात भाजपात जाणार
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली भीती...वाल्मिक कराडला वाचवण्याचाही सल्ला..
चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलता बोलता फोडली बातमी..चूक लक्षात येताच म्हणाले, अजून घोषणा झाली नाही..
खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात पहिली बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची गैरहजेरी....एसटीच्या प्रस्तावित भाडेवाढीचं काय होणार?
मंत्रिपदावरुन हटवल्यानंतरही १८ माजी मंत्री आणि खासदारांना अजूनही पुरवली जातेय सुरक्षा व्यवस्था, भागवत कराड, व्ही के सिंग यांना मिळतेय सुरक्षा...
भाजप आमदार बंब यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर मनपातील भ्रष्टाचाराची पोलखोल, आयुक्त जी श्रीकांत यांनी कोट्यवधीचा अपहार केल्याचा बंब आरोप, आयुक्तांनी आरोप फेटाळले
कोल्हापूरच्या कसबा बावड्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती झाली जिवंत, अॅम्ब्युलन्समधून नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळं शरीरात दिसल्या पुन्हा हालचाली..