Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आई अन् मुलाचा मृतदेह आढळला; मुलाच्या अंगावर व्रण, दोघं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Navi Mumbai Crime News : पोलिसांकडून (Police) सोसायटीचे सीसीटीव्ही पाहण्यास सुरवात करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई: नवी मुंबईतील (Mumbai) कामोठ्यातील एका इमारतीच्या घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता. घरातील दोन्ही मृतांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण आहेत. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेन्टमध्ये दोन मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे आढळलून आले होते. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले होते. ही घटना हत्या की आत्महत्येची आहे, याचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांकडून (Police) सोसायटीचे सीसीटीव्ही पाहण्यास सुरवात करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. (Mumbai Crime News)
कामोठे येथे घरात आई आणि मुलाची हत्या झाल्याच्या घटनेबाबत या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. क्राईम ब्रांचकडून आरोपींची चौकशी सुरू आहे. गिता जग्गी (वय 70) आणि जितेंद्र जितेंद्र जग्गी (वय 45) यांची काल हत्या झाली होती. कामोठे सेक्टर 6 येथील ड्रीम्ज सोसायटी मधील राहत्या घरात दोघांचे मृतदेह काल रात्री आढळून आले होते. चोरीच्या उद्देशाने की इतर कोणत्या कारणातून हत्या झाली आहे, याची चौकशी सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम अपार्टमेंटमध्ये आईचा आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या दोघांचीही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. कामोठे परिसरातील ड्रीम हौसिंग सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 104 चा दरवाजा आतून बंद आहे. घरातील व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नाहीत, अशी माहिती कामोठे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कामोठे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांनी दरवाजा बाहेरून उघडून घराची पाहणी केली. त्यावेळी दोघांचे मृतदेह आढळले, तर मुलाच्या अंगावरती मारल्याचे व्रण दिसून आले होते, त्यानंतर ही आत्महत्या नसून खून असल्याचा पोलिसांचा संशय बळावला होता, त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई होताना दिसून येत आहे, दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
आपल्या मुलीची एका मुलासोबत मैत्री, संतापलेल्या बापाने....
प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडील आणि दोन भावांनी मिळून एका 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून खून (Pune Crime News) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या लेकीसोबत बोलत असल्याचा रागातून बापाने आणि सख्ख्या भावांनी मिळून त्याचा निर्घृणपणे खून केला. गणेश तांडे असं हत्या झालेल्या 17 वर्षीय तरुणाचे नाव आहे.(Pune Crime News)
काल (बुधवारी) रात्री 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारात वाघोलीतील वाघेश्वर नगर परिसरात ही घटना घडली आहे. (Pune Crime News)याप्रकरणी मुलीच्या बापासह, दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नितीन पेटकर (31 वर्ष), सुधीर पेटकर (32 वर्ष ), लक्ष्मण पेटकर (60 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश तांडे आणि लक्ष्मण पेटकर यांची मुलगी यांच्यात मैत्री होती. दोघेही एकमेकांसोबत बोलत होते. मात्र, हे लक्ष्मण पेटकर यांना आवडत नव्हतं. त्याचा राग मनात धरत त्यांनी गणेशचा जीव घेतला.(Pune Crime News)