तुला एका रात्रीत आमदार केला, आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल
Dhairyashil Mohite Patil, Akluj : एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे. आपण त्याला इथून निवडून दिला. त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला. म्हणाला 70 -75 वर्षात जेवढा विकास झाला, तो मी पाच वर्षात केला.
Dhairyashil Mohite Patil, Akluj : "एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे. आपण त्याला इथून निवडून दिला. त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला. म्हणाला 70 -75 वर्षात जेवढा विकास झाला, तो मी पाच वर्षात केला. मी फक्त त्याला उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरुन लोकांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवायचय. तुम्ही आमच्या कुटुंबावर तीन पिढ्या प्रेम करत आहात. सहकार महर्षी आणि विजयदादांच्या विचारांना तडा जाऊ देणार नाही, एवढा शब्द मी देतो",अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर केली. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते.
गेल्या 60-65 वर्षांमध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी दोस्ती जपली
धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, शरद पवार साहेबांना का सोडून गेलो, याचं उत्तर देण्याची गरज नाही. गेल्या 60-65 वर्षांमध्ये पवार साहेबांनी आणि दादांनी दोस्ती आणि ऋणानुबंध कसे जपलेत, हे सर्वांना माहिती आहे. महेबुब भाईंनी दुरावा का निर्माण झाला हेही सांगितलं. दुपारी दोस्ताना संपूर्ण राज्याने पाहिला आहे. आपण 16 तारखेला आपण पुन्हा भेटणार आहोत.
स्थानिक आमदार सगळे विरोधात आहेत
धैर्यशील मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले, मी वर्षाला 1 लाख कोटी आणले. तासाला हजार कोटी आणले म्हणतो, याचे कामे दिसले का तुम्हाला? याला काय काम करायचे हे सुद्धा माहिती नाही. मी प्रत्येक तालुक्यात गेलो. वृद्धांसाठी चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला. केंद्रातून वृद्धांसाठी साहित्य आलं. माळशीरस तालुक्यात वाटप झालं. याने प्रत्येक तालुक्यात फोन करुन सांगितलं. बीडीओला फोन लावला, सीईओला फोन लावला. सामान अजूनही पडून आहे. अपंग लोकांना साहित्य मिळू दिलं नाही. स्थानिक आमदार सगळे विरोधात आहेत. त्यांनी सांगितलं साहित्य वाटायचं नाही, साहित्य वाटायचं असेल तर आमच्या हाताने वाटायचं. मी अधिकाऱ्यांना फोन लावला. आमच्या हस्ते वाटप नाही झाले तरी चालेल. गोर गरिबांसाठी आलं आहे. ते त्यांन मिळू द्या. अजूनही वाटप झालेलं नाही, गोडाऊनमध्ये पडून आहे. एक लाख कोटी याचे कोठे गेले मला समजत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या