एक्स्प्लोर

मोहिते पाटलांच्या नाराजीनंतर निंबाळकरांचं तिकिट जाणार? भाजप संकटमोचकाच्या वक्तव्यानं माढ्यात चर्चा

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्यात महायुतीसमोर नवा पेच उभा राहिलाय. रणजीतसिंह निंबाळकरकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि इच्छुकांच्या गोटात नव्या हालचाली सुरू झाल्या.

Dhairyasheel Mohite Patil vs Ranjit Naik Nimbalkar, Madha Lok Sabha Election 2024 : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि सर्वपक्षीय नेत्यांची तारांबळ उडालीय. उमेदवार प्रचाराच्या नियोजनात गुंतलेत, तर काही नेते उमेदवारी मिळवण्यासाठी आटापिटा करतायत. मात्र, माढ्यात महायुतीसमोर नवा पेच उभा राहिलाय. रणजीतसिंह निंबाळकरकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि इच्छुकांच्या गोटात नव्या हालचाली सुरू झाल्या. मोहिते पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून लढण्यास इच्छुक होते. तर विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीविरोधात मोहिते पाटील आणि निंबाळकर एकवटल्याचं दिसून येतंय. मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासू गिरीश महाजन यांना अकलूजला पाठवलं, पण कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करत नाराजी आणि संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांची समजूत काढताना महाजन यांनी केलेल्या विधानाची माढ्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. भाजप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकिट कापणार का? या चर्चेला वेग आला. मोहिते पाटील कार्यकर्त्यांची समजूत काढताना महाजन यांनी अजून वेळ गेलेली नाही, वरिष्ठांकडे तुमची नाराजी पोहचवतो, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर माढ्याच्या राजकारण तापलं आहे. 

भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी अकलूज येथे जाऊन मोहिते पाटलांची भेट घेतली.त्यांची नाराजी दूर करण्याचा आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोहिते पाटील आणि महाजन यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. गिरीश महाजन मुंबईकडे परतण्यासाठी निघाले, पण मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रंचड गोंधळ घातला. शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी आडवली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा घातला. निंबाळकरांना पाडा, तुतारी हातात घ्या,.. यासारख्या घोषणा दिल्या. अशातच विजयसिंह मोहिते पाटील पाटील पुन्हा घरवापसी करणार असा अशा चर्चा रंगू लागल्या. शरद पवार यांच्याकडून मोहिते पाटील यांना उमेदवारीची ऑफर दिल्याची चर्चाही सुरु आहे. 

निंबाळकरांचं तिकिट कापलं जाणार ? महाजन काय म्हणाले ?

मोहिते पाटील यांची नाराजी, राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार  आहे. वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा  प्रयत्न केला. येथील सर्व काही मी वरिष्ठांच्या कानावर घालणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर सर्वकाही घालेन, त्यानंतर ते निर्णय घेतील. लोकसभासाठी आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे., मोहिते पाटलांची नाराजी, राग आपल्याला परवाडणारा नाही, असे म्हणत महाजन यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महाजन यांच्या वक्तव्यानंतर निंबाळकरांचं तिकिट कापलं जाणार का? या चर्चा माढ्यामध्ये सुरु आहे. 

कार्यकर्त्यांचा प्रचंड संताप - 

मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आज तासभर चर्चा झाली. महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.  बंद दाराआड बैठक सुरू असताना मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले.  गिरीश महाजन बाहेर येताच खूप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना पुन्हा घरात नेले. पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही. जवळपास दोन तास राडा सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय  शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली. 

माढ्यात कार्यकर्ते नाराज, भाजपला फटका बसणार का ?

जवळपास दोन तास राडा सुरु होता. यावेळी कार्यकर्त्यांनी माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्याशिवाय  शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली. मोहिते पाटील यांची नाराजी , राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार  आहे. वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभारून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा  प्रयत्न केला. 
 
खासदार निंबाळकरांचे विरोधक एकवटले, तुतारी हातात घेणार का? 

माढा लोकसभा मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आज मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात फलटण , माण खटाव , करमाळा, माढा सांगोला परिसरातील मोहिते पाटील समर्थक जमा झाले होते. यात रामराजे निंबाळकर , संजीव बाबा निंबाळकर , आमदार दीपक चव्हाण , शेकाप चे आमदार भाई जयंत पाटील , करमाळा माजी आमदार नारायण पाटील असे नेते उपस्थित होते. दुपारी माढा लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. बैठक संपल्यावर मात्र कोणत्याही नेत्याने ही राजकीय बैठक नसून आम्ही फक्त स्नेहाभोजनसाठी आलो होतो अशी उत्तरे देत वेळ मारून नेली. आज झालेल्या घडामोडींवर शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून मोहिते पाटील याना तुतारी देवून उमेदवारी देण्याचा घडामोडींना वेग आला आहे. मूळचे पवारांचे विश्वासू सहकारी असलेले मोहिते-पाटील सध्या भाजपवासी असून सध्याच्या गणितानुसार, ते स्वगृही परतू शकतात, अशा चर्चांनी जोर धरलाय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget