एक्स्प्लोर

Nitin Deshmukh: शिंदे गटातील आमदाराची टीप, फडणवीसांनी रचलेला ठार मारण्याचा प्लॅन; नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: सत्तास्थापनेत अडथळा होत असल्याने फडणवीसांनी माझा 'गेम' करायचा कट रचला होता: नितीन देशमुख

अकोला: राज्यातील सत्तासंघर्षावेळी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलो होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझा गेम करण्याचा प्लॅन रचला होता, असा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. शिंदे गटातील एका आमदारानेच मला ही माहिती दिली. त्याने सांगितले की, तुम्ही ज्यावेळी सुरतमध्ये होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: तुम्हाला ठार मारण्याचे षडयंत्र रचले होते. शिंदे गटासोबत सत्तास्थापन करण्याच्या प्लॅनमध्ये मी अडथळा ठरत असल्याने फडणवीस यांना माझा गेम करायचा होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुरतमध्ये असताना मला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी प्रसारमाध्यमांना दिली, असा दावाही नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला. ते शुक्रवारी अकोल्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी या गोष्टी करताना विचार करायला पाहिजे. वेळ आल्यावर आम्ही अशा लोकांचा हिशेब चुकता करु. आम्ही मरणाला न घाबरणाची माणसे आहोत, असेही देशमुख यांनी म्हटले.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येबाबत देशमुखांना वेगळाच संशय

ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या हत्येबाबत नितीन देशमुखांनी एक वेगळीच थिअरी मांडली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हा याचीही नंतर कुणीतरी हत्या केली असावी, असं मला वाटतं. यात कुणीतरी तिसऱ्या माणसाचाही हात असावा, अशी दाट शंका मला असल्याचे नितीन देशमुख यांनी म्हटले. 

नितीन देशमुख सुरतमध्ये असताना काय घडलं होतं?

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांचा जो एक गट केला होता, त्यामध्ये नितीन देशमुख यांचा समावेश होता. मात्र, सुरतमध्ये नितीन देशमुख यांची प्रकृती अचानक बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांच्या छातीत वेदना होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांकडे दिली होती. काही दिवसांनी नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर आरोप केले होते. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला तयार नसल्याने सुरतमध्येच माझा घात करण्याचा भाजपचा डाव होता. रुग्णालयात मला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन टोचण्यात आले. माझ्या मागे पोलीस लावण्यात आले. तसेच डॉक्टरांच्या मदतीने मला ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असे आरोप नितीन देशमुख यांनी केले होते. 

आणखी वाचा

शिंदेंसोबत सूरतला गेले, पण गुवाहाटीला जाण्यापूर्वीच ठाकरेंकडे परतले; नितीन देशमुख ठरले पात्र

"तू आतमध्ये ये, तुला गेटवरच अटक करतो," पोलिसांनी नितीन देशमुख यांना धमकी दिल्याचा भास्कर जाधव यांचा दावा

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शिवसेना आमदार बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा दाखल, मोर्चादरम्यान नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! शिवसेना आमदार बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा दाखल, मोर्चादरम्यान नेमकं काय घडलं? 
Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँकेच्या 15 जागा बिनविरोध, 6 जागांसाठी 13 उमेदवार आमने सामने, गोपीचंद पडळकर, संजयकाका पाटील यांच्यापुढं कोणाचं आव्हान?
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत 6 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात, गोपींचद पडळकर यांच्याविरोधात कोण रिंगणात?
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget