(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election 2022: प्रियंका गांधींना राज्यसभेवर पाठवणार काँग्रेस? समोर आली ही मोठी माहिती
Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांबाबत काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू असताना, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे.
Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांबाबत काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू असताना, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे काही नेते यावेळी सरचिटणीस प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या बाजूने आहेत. त्यांनी या संदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर ही इच्छा बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुका अजून दूर आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधींसारख्या तगड्या आणि प्रभावशाली वक्त्या संसदेत हजर राहिल्या, तर भाजपला टक्कर देण्यात ते बर्याच अंशी यशस्वी होतील, असा युक्तिवाद या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
सोनिया गांधींना विनंती
अलीकडेच, सूत्रांनी एबीपी न्यूजला सूचित केले होते की, लवकरच पक्षात प्रियंका गांधींची Priyanka Gandhi) भूमिका देखील वाढणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठवण्याचे समर्थन करणाऱ्या काही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. मात्र त्यांच्या बाजूने सध्या तरी परिस्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. यानंतर आता काँग्रेस प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठवणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अनेक नावांची आहे चर्चा
दरम्यान, काँग्रेस (Congress) राज्यसभेच्या उमेदवाराबाबत अनेक नावांवर चर्चा करत आहे. यामध्ये माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, पक्षाचे सरचिटणीस अजय माकन, सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राजस्थानचे माजी खासदार भंवर जितेंद्र सिंह, माजी खासदार बद्री राम जाखर, कुलदीप विश्नोई यांचा समावेश आहे. तसेच अजित कुमार आणि सुबोध कांत सहाय आदी नेत्यांच्या नावांचाही समावेश आहे. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश (Jairam Ramesh) यांचे नाव आधीच निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rajya Sabha Election : संभाजीराजेंना माघार घ्यावी लागली याचं मला दुःख वाटतं: पंकजा मुंडे
राज्यात 30 जूनपर्यत कुठलीही प्रशासकीय बदली होणार नाही ; राज्य सरकारचा निर्णय