एक्स्प्लोर

NMC Elections : विविध उपक्रमांद्वारे प्रभागात माहोल निर्मितीला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत

'हर घर तिरंगा'द्वारे भाजपने माहोल तयार केला तर काँग्रेसनेसुद्धा गौरव यात्रा काढून वातावरण ढवळून काढले आहे. यानिमित्ताने दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांनी सहभागी होऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

नागपूरः महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांनी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्यात येणार असल्याने भाजप इच्छुकांचे चेहरे खुलले असून धडाक्यात उत्सव साजरे केले जात आहे.

नागपूर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून सहा महिने लोटले आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धती करुन निवडणुकीची संपूर्ण तयारी केली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. शिंदेसेना- भाजप युतीच्या सरकारने प्रभाग पद्धती आणि नगरसेवकांची वाढवण्यात आलेल्या संख्येचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे संपूर्ण तयारी वाया गेली. आता नव्याने प्रभाग रचना, आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे. असे असले तरी अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी नोव्हेंबरमध्ये महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे इच्छुक पुन्हा कामाला लागले आहे.

सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रियता

भाजपचे इच्छुक उमेदवार यांनी सर्वच उत्सव धडाक्यात साजरे करणे सुरू केले आहे. मोदी यांच्या 'हर घर तिरंगा'च्या माध्यमातून भाजपने माहौल तयार केला आहे. कॉंग्रेसनेसुद्धा गौरव यात्रा काढून वातावरण ढवळून काढले आहे. यानिमित्ताने भाजप आणि कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी यात्रेत सहभागी होऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शहरातील असल्याने तीन दिवस भाजपने प्रचाराची पहिली फेरी आटोपली. कॉंग्रेसतर्फे राष्ट्रीय महासचिव तसेच खासदार मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांनी सुद्धा यात्राकाढून कार्यकर्त्यांना कामाला लावले. मात्र यातही कॉंग्रेसची गटबाजी दिसून आली. विधानसभानिहाय गौरव यात्रा काढायच्या होत्या. मात्र उत्तर नागपूरची वेगळी यात्रा काढण्यात आली. यात सहभागी झालेले नेते शहराच्या इतर मतदारसंघातील यात्रेत सहभागी झाले.

Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण आवश्यक - मोहन भागवत

युवा कार्यकर्त्यांना उत्साहीत करण्यासाठी प्रयत्न

महाविकास आघाडी सरकार असताना पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल होणार हे निश्चित होते. त्यानुसार विविध पक्षातील युवा कार्यकर्ते आपल्या वार्डात दावेदारी सिद्ध करण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले होते. लोकांच्या भेटी घेणे सुरु केले होते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन, आंदोलनेही सुरु केली होती. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारनेही शेवटी तीन वार्डांचा प्रभाग जाहीर केल्याने आपण एवढ्या मोठ्या प्रभागात आर्थिक दृष्या टीकू शकत नसल्याचा अंदाज आल्याने या युवा कार्यकर्त्यांनी अपेक्षा सोडली होती. त्यानंतर राज्यातील सत्तांतरानंतर चार वार्डांचा एक प्रभाग ही रचना करण्यात आल्याने यंदा मनपा निवडणूकीचे स्वप्न अनेकांनी सोडून दिले असल्याचे खासगीत बोलून दाखविले आहे.

Nagpur Municipal Corporation : सोशल मीडियावर मनपाची फक्त चमकोगिरी, नागरिकांच्या तक्रारी न सोडवताच 'क्लोज'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget