एक्स्प्लोर

Buldhana Loksabha : 'जाधवांच्या' विजयापेक्षा 'तुपकरांच्या' पराजयाचीच चर्चा, दोन्ही विरोधी उमेदवारांना घाम फोडला

Buldhana Loksabha : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधवांनी चौथ्यांदा विजय संपादन केला आहे. या लढतीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा 29 हजार मतांनी पराभव केला आहे.

Buldhana Loksabha : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधवांनी चौथ्यांदा विजय संपादन केला आहे. या लढतीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा 29 हजार मतांनी पराभव केला आहे. मात्र या मतदार संघात प्रतापरावांच्या विजयापेक्षा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांच्या पराजयाची चर्चा होत आहे. या मतदारसंघात 10 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पहिल्यांदाच दोन प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनीही तिहेरी लढत दिली. यामध्ये या उमेदवाराने बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 2 लाख 49 हजार 963 मते मिळविली. या माध्यमातून मताधिक्याचा विक्रम नोंदविला असून विजयी आणि पराभूत दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येवर त्यांचा परिणाम दिसून आला. बुलढाणा येथील शेतकरी रहिवासी रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळीशी जुळलेले आहेत.

रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीकडून त्यांनी उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा झाल्याची उमेदवार निश्चित होण्याच्या आधी राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, ठाकरेंनी उमेदवार घोषित केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. ते अर्ज मागे घेणार असल्याची कुजबूजही संपूर्ण जिल्ह्यात त्यावेळी सुरू होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत थेट लोकसभा निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यांच्यामुळे दुहेरी लढतीचे तिहेरी लढतीत रूपांतर झाले आणि निकालाअंती त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात नोंद करता येतील, असे मताधिक्य गाठल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रतापराव जाधव यांना घाटाखालील खामगाव आणि जळगाव जामोद या मतदारसंघाने प्रचंड मताधिक्य दिले, एवढे की त्या आधारावरच ते विजेते ठरले. होमग्राउंड असलेल्या मेहकर विधानसभेत त्यांची नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांच्याशी फाईट झाली. शेवटी 243 मतांची नरेंद्र खेडेकर निसटती आघाडी मिळवली. मेहकर विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले तुपकर नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा केवळ 79 मतांनी मागे होते. प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर यांच्यात मेहकर विधानसभेत केवळ 322 मतांचे अंतर राहिले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाने रविकांत तुपकर यांना भरभरून आशीर्वाद दिले. तुपकर यांनी सिंदखेडराजा विधानसभेत तब्बल 74 हजार 753 मते घेत प्रतापराव जाधव यांच्यावर 29 हजार 989 मतांची आघाडी घेतली. मात्र रविकांत तुपकर खामगाव आणि जळगाव जामोदमध्ये खूप मागे पडले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातही रविकांत तुपकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे या मतदार संघात प्रतापरावांच्या विजयापेक्षा अपक्ष उम्मेदवार रविकांत तुपकरांच्या पराजयाची जास्त चर्चा होत आहे.

जाधव यांची प्रतिष्ठा अन् खेडेकराचे भवितव्य

2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बाजी मारून खासदार जाधव जिल्ह्याचे मोठे नेते झाले. मात्र चौथी लढत त्यांच्यासाठी निर्णायक आणि भावी राजकारणाची दिशा ठरविणारी ठरली. ‘अँटी इन्कबन्सी’, बंडखोरीमुळे लागलेला डाग, मतदारांची व्यापक नाराजी, भाजपाची दावेदारी, वंचितचा कमकुवत उमेदवार, यामुळे यंदाची लढत त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरली. मात्र, अनुभव, नियोजन, अचूक व्यूहरचना या त्रिसूत्रीने त्यांनी यावर मात केली. यामुळे ते विजयाच्या शर्यतीत खंबीरपणे टिकून राहिले. यंदाचा विजय त्यांना आणखी मोठा करणारा आणि ‘दिल्लीत मोठी संधी’ देणारा ठरला आहे. तसेच जिल्ह्यातील शिंदे गटावर त्यांचेच प्रभुत्व कायम ठेवणारा राहिल.

इतर महत्वाच्या बातम्या 

भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला; नवनीत राणांचा पराभव, अमरावतीत राजकीय खलबतं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 : ABP MajhaFatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे तर 191 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल; पोलिसांकडून आकडेवारी समोर
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
Embed widget