TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 : ABP Majha
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, आजच शासकीय आदेश जारी करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
भाजप नेते विश्वबंधु राय यांच्याकडून मुंबईत ठिकठिकाणी बांगलादेशींच्या विरोधात पोस्टरबाजी, आमचा देश सोडून जा अशा आशयाचे पोस्टर, कारवाईसाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं नागरिकांना आवाहन.
मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशीला पार्कसाईट पोलिसांकडून अटक, शहादत अब्दुल रशीद शेख हा पवईत चायनीजचा धंदा करत होता.
एचएमपीव्हीवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाकडून टास्क फोर्स गठीत, जे.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे टास्क फोर्सच्या अध्यक्ष.
देशात एचएमपीव्हीच्या ११ रुग्णांची नोंद, आज २ नवे रुग्ण आढळले, गुजरातमध्ये ८ वर्षांचा मुलाला तर उत्तर प्रदेशात ६० वर्षीय महिलेला एचएमपीव्हीची लागण.
नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई स्लीपर वंदे भारत लवकरच धावण्याची शक्यता, स्लीपर वंदे भारतच्या उत्पादनाला सुरुवात, नागपूरहून पुणे आणि मुंबईसाठी स्लीपर रेल्वे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव.
नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील वाघ आणि बिबट्यांना चिकन बंद, बर्डफ्लूच्या दहशतीमुळे वाघांना चिकन ऐवजी म्हशींच्या बिफचा आहार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती.
आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरूणीवर तिच्याच सहकाऱ्याकडून कोयत्यानं वार, पुण्याच्या येरवडा परिसरातील घटनेचा व्हिडीओ समोर, आर्थिक वादातून केली होती हत्या.