एक्स्प्लोर

रामटेक बंगल्यात राहिलेल्या तिन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू; यंदा चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाट्याला, नेमका इतिहास काय?

Ramtek Bungalow for Chandrasekhar Bawankule: रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकं मुरडताना दिसताय. अशातच राजकीय वर्तुळात शुभ-अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे.

मुंबई : मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी-फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला (Ramtek Bungalow) होय. मात्र, याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकं मुरडताना दिसताय. अशातच राजकीय वर्तुळात शुभ-अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे. यंदा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना मिळाला आहे. 

दरम्यान, माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांचं वास्तव्य ह्याच बंगल्यात होतं. मात्र अलिकडे झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात तिन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळताना दिसलाय,  त्यामुळे अनेक उलट सुलट अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच, बावनकुळे हा बंगला स्वीकारतात का? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 

महायुतीच्या 31 मंत्र्‍यांना बंगल्याचं वाटप

राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्‍यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रि‍पदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ (Minister) खातेवाटपानंतर आता मंत्र्‍यांना  मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. महायुतीच्या 31 मंत्र्‍यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे.

त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडेंना सातपुडा, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे. दरम्यान, आधी मंत्रीपदावरुन, नंतर खातेवाटपावरुन काही नेत्यांमध्ये नराजाी पाहायला मिळाली. मात्र, आता बंगले वाटपावरुनही मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, गत बहुतांश मंत्र्यांना त्यांचेच बंगले अलोट करण्यात आल्याचं यादीवरुन दिसून येते. 

कोणत्या मंत्र्यांस कोणता बंगला?

निवासस्थान राम शिंदे, सभापती, विधान परिषद ज्ञानेश्वरी, राहुल नावेकर, अध्यक्ष विधानसभा शिवगिरी, चंद्रशेखर बावनकुळे रामटेक, राधाकृष्ण विखे-पाटील रॉयलस्टोन, हसन मुश्रीफ (क-८) विशाळगड,  चंद्रकांतदादा पाटील ब-१ सिहगड,  गिरीश महाजन सेवासदन, गुलाबराव पाटील जेतवन, गणेश नाईक ब-४ पावनगड ,  दादा भुसे ब-३ जंजीरा, संजय राठोड शिवनेरी, धनंजय मुंडे सातपुडा, मंगलप्रभात लोढा ब-५ विजयदुर्ग, उदय सामंत मुक्तागिरी, जयकुमार रावल चित्रकूट, पंकजा मुंडे पर्णकुटी, अतुल सावे अ-३ शिवगढ़, अशोक उईके अ-९ लोहगड, शंभूराजे देसाई मेघदूत, आशिष शेलार व-२ रत्नसिषु, दत्तात्रय भरणे ब-६ सिध्दगड, अदिती तटकरे अ-५ प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले ३-७ पन्हाळगड, माणिकराव कोकाटे अंबर-२७, जयकुमार गोरे क-६ प्रचितीगड, नरहरि झिरवाळ सुरुचि ०९, संजय सावकारे अंबर-३२, संजय शिरसाठ अंबर-३८, प्रताप सरनाईक अर्वतो-५, भरत गोगावले सुरुचि ०२, मकरंद पाटील सुरुचि-०३

हेही वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणीManu Bhakar : मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही शिफारस नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Embed widget