Varun Gandhi: 'देशसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना आत्महत्या करावी, असं का वाटतेय? वरुण गांधींचं भाजप टीकास्त्र
BJP MP Varun Gandhi on Unemployment: भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला लक्ष्य केले आहे.
BJP MP Varun Gandhi on Unemployment: भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनी भारतीय लष्करातील रिक्त पदांवर प्रश्न उपस्थित केला आहे. 1 लाख पदे रिक्त असूनही सैन्यात भरती निघत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी सैन्य भरतीची तयारी करत असल्याचं दिसत आहे.
बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत वरून गांधी यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. देशाचे रक्षण करू इच्छिणाऱ्या तरुणांची आता निराशा होत आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत सरकारला मेसेज दिला आहे.
वरुण गांधी यांनी आपल्याच सरकारवर टीकास्त्र सोडले
देश के लिए कुछ कर गुजरने की हसरत, मगर हमारे युवाओं को सिवाय निराशा के कुछ हाथ नहीं लग रहा।
— Varun Gandhi (@varungandhi80) June 12, 2022
लगभग 1 लाख रिक्त पद होने के बावजूद सेना में भर्तियां नहीं निकल रही।
हताश युवा जो सीमा पर जा कर देश सेवा करना चाहते हैं, वो अब आत्महत्या करने को मजबूर हैं। क्यों?pic.twitter.com/nDgHOXiw2D
वरुण गांधी यांनी ट्वीट केले की, 'देशासाठी काहीतरी करायची इच्छा असूनही आमच्या तरुणांना निराशेशिवाय काहीच हाती लागत नाही. सुमारे 1 लाख पदे रिक्त असूनही सैन्यात भरती होत नाही. सीमेवर जाऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या हताश तरुणांना आता आत्महत्या करण्यास भाग पडत आहे, असं का'?
दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी हे अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. अलीकडे वरुण गांधी विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे मांडताना दिसले. बेरोजगारी आणि नोकरभरतीबाबत त्यांनी अनेकवेळा आपल्याच सरकारला लक्ष्य केलं आहे. अलीकडेच वरून गांधी यांनी RRB-NTPC परीक्षेसाठी ट्रेन उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विशेष ट्रेनसाठी रेल्वेला पत्रही लिहिले होते, त्यानंतर सरकारनेही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Prophet Muhammed Row : नुपूर शर्मांच्या आडचणीत आणखी वाढ, पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल
Attack In Delhi On Woman : मंत्र्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीवर हल्ला, दोन जण पसार