श्रीकांत शिंदेंसाठी भाजप आमदारावर कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ, कल्याणमध्ये भाजप-शिंदेच्या गटाच्या वादावर पडदा
Shrikant Shinde and Ganpat Gaikwad, Kalyan : कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हेच असतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
Shrikant Shinde and Ganpat Gaikwad, Kalyan : कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हेच असतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कार्यकर्त्यांची वेळ आली आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध असला तरी आता शिंदे गट आणि भाजप मधील वादावर पडदा टाकण्यात महायुतीला यश आलंय. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे.
गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी घेतली पत्रकार परिषद घेतली. गणपत गायकवाड यांनी भूमिका कार्यकर्त्यांना कळवली , मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. राज्यात 45 पार करायचं आहे ,त्यामुळे महायुतीच्या उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे ते सध्या जेलमध्ये आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या समर्थकांनी बैठक घेत श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता.
मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे
कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपला मिळावा,अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. ती गैर नव्हती. मात्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराची घोषणा केली त्या भूमिकेचं स्वागत आहे, अशी भूमिका गणपत गायकवाड यांनी कार्यकर्त्याना कळवली , मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे,राज्यात 45 पार करायचं आहे ,त्यामुळे महायुतीच्या उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणे गैर नाही
भाजपच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी बैठक घेतली आणि घोषणा केल्या त्या अर्थी ते गुंड होत नाहीत. जो पर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मतदारसंघ आपल्याला मिळावा,अशी मागणी करणे गैर नाही. गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी समर्थन केलं असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या