एक्स्प्लोर

भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करतोय, किरीट सोमय्यांचा प्रचार समितीसाठी काम करण्यास नकार, दानवे, बावनकुळेंना लिहिलं पत्र, म्हणाले...

Kirit Somaiya Letter: आपल्या या समितीचा मी सदस्य नाही, पुन्हा अशी अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशा शब्दांत सोमय्यांनी रावसाहेब दानवे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावलं आहे. 

Kirit Somaiya Letter To BJP Leaders: मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्या वरिष्ठांनाच खडे बोल सुनावले आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा मला न विचारता केली, ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे, असं पत्र किरीट सोमय्यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb  Danve) यांना लिहिलं आहे. त्याची प्रत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना देखील पाठवली आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही, पुन्हा अशी अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशा शब्दांत सोमय्यांनी रावसाहेब दानवे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावलं आहे. 

18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करीत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावं, असं किरीट सोमय्या पत्रात म्हणाले आहेत. पुढे बोलताना सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. 3 वेळा माझा वर जीवघेणे हल्ले ही झाले. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही, असं थेट सांगितलं आहे. 

पत्रात नेमकं किरीट सोमय्या काय म्हणाले? 

मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच (5 1/2) वर्ष,  म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करीत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे.

सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. 3 वेळा माझा वर जीवघेणे हल्ले ही झाले. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार, असं किरीट सोमय्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

किरीट सोमय्या स्वपक्षावर नाराज? 

भाजप नेते किरीट सोमय्या 2014 मध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. 2019 मध्ये शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले. त्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामध्ये संजय राऊतांपासून अनिल परब, अनिल देशमुख ते थेट उद्धव ठाकरे यांच्य नावाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षानं मिहीर कोटेच्या यांना तिकीट दिल्यामुळे सोमय्या नाराज असल्याची चर्चा होती. अखेर आता पक्षानं किरीट सोमय्यांकडे पक्षाचं काम सोपवण्याचा निर्णय घेतला. अखेर अनेक वर्षांनी किरीट सोमय्यांकडे पक्षाचं काम सोपवण्यात आलं आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवली असून त्यांनी मात्र ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला आहे. सोमय्यांच्या या निर्णयामुळे किरीट सोमय्या आता स्वपक्षावरच नाराज असल्याचं बोललं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Budget 2025 :  रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
रेल्वेच्या तीन स्टॉक्समधून दमदार परतावा मिळणार? अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तज्ज्ञ प्रचंड आशावादी,म्हणाले...
Embed widget