एक्स्प्लोर

मोठी बातमी : गाडी अडवणाऱ्या मराठा आंदोलकांबाबत पंकजा मुंडे यांचा मोठा दावा, म्हणाल्या...

प्रचारासाठी माजलगाव येथे गेल्यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्यात आला होता. याच प्रकारावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड : माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलनक (Maratha Activist) नव्हते, हा तर प्रायोजित कार्यक्रम होता, असा हल्लाबोल भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. माजलगाव तालुक्यात प्रचारासाठी गेल्यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवला होता. त्यांच्यासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली होती. यावरच पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

कालचा प्रकार हा तर प्रायोजित कार्यक्रम

पंकजा मुंडे म्हणाल्या, "मागच्यावेळीही माझा ताफा अडवून अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. हा प्रकार दुसऱ्यांदा झाल्याने हे मराठा आंदोलक असू शकत नाहीत. कारण आंदोलक हे चर्चा करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे कालचा प्रकार हा तर प्रायोजित कार्यक्रम होता" 

कोणत्याही समाजाला एकमेकांच्या अंगावर घालणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी झाले नाही. मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नाही. मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण नक्कीच मिळेल, असा शब्द मी मराठा बांधवांना दिला आहे. मात्र हे प्रकार वारंवार घडत असल्याने मी भावूक झाले आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. 

 40 उमेदवार, तरीही माझ्याच वाट्याला का?

बीड जिल्ह्यात 40 उमेदवार फिरतात, मग हा अनुभव माझ्याच वाट्याला का? असा प्रश्न विचारत, हे पाहून मन छिन्न विच्छिन्न होत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.  "बीड जिल्ह्याचे सोशल फॅब्रिक जीर्ण करण्याचं मोठं षडयंत्र कोण रचतं हे माहीत नाही. मात्र यापूर्वी बीड जिल्ह्यात असं कधीच झालं नव्हतं. बीड जिल्ह्यामध्ये 40 उमेदवार फिरतात. मग आरक्षणाच्या मागणीवरून हे अनुभव माझ्याच वाट्याला का येतात?  मी कोणत्याच घटनेचा फायदा घेऊन कोणत्याही समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माझा ताफा अडवला जातो, त्यामध्ये 14,15 वर्षाची मुलं असतात हे पाहूनदेखील मन भावूक होतं. मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार सुरू आहेत, त्याचा मतावर जास्त परिणाम होणार नाही, राजकारणी म्हणून आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत, असंदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, त्याचा काही राजकीय पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा बांधवांसाठी उभा केलेल्या आंदोलनावर आमचाच हक्क आहे असं काही राजकीय पक्षांना वाटतं. मात्र आपल्या आंदोलनाचा असा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी त्यांनी सावध भूमिका घ्यायला हवी, ज्या जिल्ह्यामध्ये आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, तो जिल्हा शांत आहे. मात्र हे सगळं बीड जिल्ह्यामध्येच का होत आहे असा देखील प्रश्न आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा :

मोठी बातमी : मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला, मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी

मी रडून मत मागत नाही, मला शेवटची संधी द्या, सर्वांसमोर पदर पसरते : पंकजा मुंडे

मनोज जरांगेंवर टीका केली नाही, केली तर शब्द मागे घेत नाही, मी गोपनाथ मुंडेंची औलाद : पंकजा मुंडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget